राष्ट्रीय कर्तव्याची जाण... 'तिनं' मलेशियाहून सोलापुरात येऊन केलं मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 03:41 PM2019-04-18T15:41:47+5:302019-04-18T16:34:05+5:30
मलेशिवाय वास्तव्यास असूनही ‘lokmat.com’ च्या माध्यमातून सोलापूरचे अपडेट मिळतं असंही त्यांनी स्पष्ट केलं
सोलापूर: मुळ सोलापुरी पण नोकरीच्या निमित्तानं मलेशियात सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीनं खास मतदानासाठी सोलापुरात येऊन लिटल फ्लॉवर शाळेतील मतदान केंद्रामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.
सोलापुरातील पोस्टल कॉलनी, होटगी रोड या परिसरात वास्तव्यास असलेल्या रेश्मा वैद्य-कामत या सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. नोकरीच्या निमित्ताने अडीच वर्षापूर्वी त्या मलेशियात वास्तव्यास आहेत. भारतात होणाऱ्या सर्वात मोठ्या लोकशाही मतदासाठी आपण गेलंच पाहिजे या निर्धारानं दोन दिवसांपूर्वी सोलापुरात आल्या आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी आपल्या आप्तेष्टांसमवेत लिटल फ्लॉवर स्कूलमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
गतवेळीच्या मतदानावेळी त्या सोलापुरात होत्या. मागची आणि या निवडणुकीमधील तुलनात्मक स्थिती पाहता यंदा मतदनामध्ये अधिक पारदर्शी पणा आल्याचे त्या म्हणतात. मागच्यावेळी ईव्हीएम मशिनमधील घोटाळ्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने यंदा या यंत्रेणेमध्ये बदल करुन व्ही. व्ही. पॅटचा वापर कलाय तो खूप चांगला आहे. यामुळे मला मी कोणाला मतदान केलं हे तिथेच प्रत्यक्ष पहायला मिळतं. यामुळे बोगस मतदानाला आळा बसू शकेल असं आपणास वाटत असल्याचं रेश्मा वैद्य-कामत यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.
मलेशिवाय वास्तव्यास असूनही ‘ऑनलाईन लोकमत’च्या माध्यमातून सोलापूरचे अपडेट मिळतं असंही त्यांनी स्पष्ट केलं.
----------------------
मी लोकमत वृत्तपत्राची वाचक आहे. रोज सकाळी मलेशियामध्ये ऑनलाईन लोकमत वृत्तपत्र वाचते. भारतातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे मतदान होत आहे. खास मतदानासाठी मी मलेशियावरुन येऊन लिटल फ्लॉवर स्कूलमधील मतदान केंद्रावर माझा मतदानाचा हक्क बजावला.
- रेश्मा वैद्य-कामत
पोस्टल कॉलनी सोलापूर