पंढरपुरातील शासकीय वस्तीगृहातील मुलींचा लैंगीक छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:00 PM2018-07-10T13:00:46+5:302018-07-10T13:02:40+5:30
निर्भया पथकामुळे उघडकीस आला प्रकार
पंढरपूर : येथील मुलींच्या शासकीय वस्तीगृहातील विध्यार्थींना वेगवेगळ्या कारणांवरुन कार्यालयात बोलवून अश्लिील कृत्य करणाºया वसतीगृहाच्या अधिक्षक संतोष प्रभाकर देशपांडे (वय ५३, रा. गुरुकृपा सोसायटी, चैतन्य नगर, पंढरपूर) करत होता. हा सर्व प्रकार निर्भया पथकाच्या भेटी दरम्यान उघडकीस आला आहे.
पंढरपूर पालीस विभागाची निर्भया पथकाची पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे च उपनिरीक्षक प्रिती जाधव व टिमसह वस्तीगृहामध्ये भेट करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पथकातील महिला पोलीसांनी विद्यार्थींना काही अडचणी आहेत का ? अशी विचारणा केली.
यावेळी विद्यार्थींनी वस्तीगृहाचे अधिक्षक संतोष प्रभाकर देशपांडे यांच्या विषयी तक्रारीचा पाढाच वाचला. वस्तीगृहातील अनेक विध्यार्थींना विविध कारणांनी कार्यालयात एकटे बोलावून अश्लिल वर्तन करत असल्याची तक्रार ठाण्यामध्ये दिली आहे. यानुसार मंगळवारी पहाटे १ वाजता संतोष देशपांडे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उप अधिक्षक अनिकेत भारती करत आहेत.
चोर पावलानी मुलीच्या रुम मध्ये प्रवेश
शासकीय वस्तीगृहातील मुली रुममध्ये एकट्या असताना वस्तीगृहाचे अधिक्षक संतोष देशपांडे हे चोर पावलांनी रुममध्ये प्रवेश करतात. व वाईट हेतुने स्पर्श करत असल्याची माहीती मुलींनी उपपोनि. प्रीती जाधव व उपपोनि. गजानन गजभारे यांनी दिली.
ई-मेल करण्याचा बहाने विद्यार्थींनीला बोलवून दिला त्रास
वस्तीगृहाचे अधिक्षक संतोष प्रभाकर देशपांडे यांनी एका विद्यार्थींनीला फेब्रुवारी २०१८ महिन्यातील एकादिवशी ई-मेल करण्याच्या कारणावरुन कार्यालयात बोलवले. त्यानंतर तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याची तक्रार पडित विद्यार्थींनीने पोलीसांना दिली आहे.