माळशिरस तालुका ठरतोय राजकीय निर्णयांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:22 AM2021-04-10T04:22:16+5:302021-04-10T04:22:16+5:30
माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती निवडीची प्रक्रिया प्रशासनाने नुकतीच रद्द केली. मात्र, सर्वाधिक कोरोना हॉटस्पॉट असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती ...
माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती निवडीची प्रक्रिया प्रशासनाने नुकतीच रद्द केली. मात्र, सर्वाधिक कोरोना हॉटस्पॉट असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पंचायत समितीची निवड पार पडली. याशिवाय सांगली जिल्ह्यातील आटपाडी पंचायत समितीचीही निवड झाली. मग माळशिरस पंचायत समितीसाठी वेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. घोषित केलेला कार्यक्रम रद्द करण्यामागे राजकीय षडयंत्र आहे काय, याबाबत निवडणूक आयोगाकडे सभापती साठे यांनी तक्रार केली आहे.
कोट ::::::::::::::
कोरोना महामारीच्या परिस्थितीत विधानसभेची पोटनिवडणूक, राज्यातील इतर पंचायत समितीच्या निवडी, याबाबत वेगळे नियम व माळशिरस पंचायत समितीसाठी वेगळे नियम करण्यामागे प्रशासनाचा काय हेतू असावा, याबाबतीत तालुक्यावर अन्याय झाला आहे. त्या संदर्भातील तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
- शोभा साठे, सभापती