माळशिरस पंचायत समिती, अकलूज ग्रामपंचायतीवर आता भाजपचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 19:14 IST2019-03-20T19:14:18+5:302019-03-20T19:14:54+5:30
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासमवेत माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सूळ, अकलूज ...

माळशिरस पंचायत समिती, अकलूज ग्रामपंचायतीवर आता भाजपचा झेंडा
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासमवेत माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सूळ, अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी यांनी भाजपात प्रवेश केला.
माळशिरस पंचायत समिती गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आले. २०१२ ते २०१७ या कालावधीत माळशिरस पंचायत समितीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्चस्व होते. पुन्हा २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे २२ पैकी १५ सदस्य निवडून आले. या सर्व १५ सदस्यांनी रणजितदादा यांच्यासोबत भाजपा प्रवेश केला आहे. अकलूज ग्रामपंचायतीवर आजवर कधीही भाजपचा झेंडा लागला नव्हता. आता मात्र तिथे भाजपचा झेंडा फडकणार आहे.