कोरोना काळातील कामगिरीबद्दल ममदापूरचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:16 AM2021-07-18T04:16:32+5:302021-07-18T04:16:32+5:30
कारी : कोरोना काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल ममदापूर (ता. बार्शी) चा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला. ममदापूर ...
कारी : कोरोना काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल ममदापूर (ता. बार्शी) चा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
ममदापूर हे बार्शी तालुक्यातील छोटे गाव. परंतु कोरोना काळात हॉटस्पॉट झाले. ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव’ हे अभियान राबविण्यात आले. त्यानंतर गाव तेथे कोविड सेंटर, प्रभात फेरी, ग्राम समितीच्या बैठका अशा उपक्रमातून कोरोनामुक्त गावासाठी प्रयत्न झाले. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कोरोना समितीचे सदस्य माजी सैनिक उद्धव घोडके यांचे नियोजन मोलाचे ठरले.
कार्यक्रमास गटविकास अधिकारी शेखर सावंत, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, मंडळ कृषी अधिकारी विलास मिस्कीन यांनी सरपंच आश्विनी मोरे, उपसरपंच बिभीषण गायकवाड व उद्धव घोडके यांचा सन्मान तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळ कृषी अधिकारी विलास मिस्कीन, कृषी सहायक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सोसायटी चेअरमन, आरोग्य सेविका, आशा सेविका उपस्थित होते.
---------------
१७ ममदापूर
ममदापूरचा गौरव करताना गटविकास अधिकारी शेखर सावंत, शहाजी कदम, विलास मिस्कीन, सरपंच आश्विनी मोरे, बिभीषण गायकवाड