शेतकरी केंद्रबिंदू मानून कारखान्याचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:24 AM2021-09-18T04:24:10+5:302021-09-18T04:24:10+5:30
भोसे (ता. पंढरपूर) येथील कृषीराज शुगर कारखान्याचा तृतीय बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कार्यक्रमप्रसंगी ॲड. गणेश पाटील बोलत होते. चालू गाळप ...
भोसे (ता. पंढरपूर) येथील कृषीराज शुगर कारखान्याचा तृतीय बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कार्यक्रमप्रसंगी ॲड. गणेश पाटील बोलत होते.
चालू गाळप हंगामात १ लाखापेक्षा जास्तीचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही कारखाना काटकसरीने चालवत आहोत. ज्या ध्येयधोरणाने यशवंतभाऊ आणि राजूबापू यांनी राजकीय आणि सामाजिक बांधिलकी जोपासली त्यांचा वारसा घेऊन शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आम्ही कारखान्याचा कारभार करीत असल्याचे ॲड. पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी कारखान्याचे संचालक शेखर पाटील व त्यांच्या पत्नी संजीवनी पाटील यांच्या हस्ते तर सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष जयवंत गावंधरे, शहाजी पाटील, धैर्यशील पाटील, सोमनाथ थिटे, प्रसाद पाटील, बाळासाहेब शेख, नागनाथ भांडे आदी उपस्थित होते. यावेळी जि. प. सदस्य अतुल खरात, मधुकर माळी, नागनाथ काळे व धनाजी तळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार आशिष पाटील यांनी मानले.
----