युटोपियन शुगर्सचे व्यवस्थापन आता रोहन परिचारकाकडे; उमेश परिचारकांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 06:32 PM2021-10-10T18:32:46+5:302021-10-10T18:32:52+5:30
चालू गळीत हंगामात साडेसहा लाख मे.टना पेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट : मंगळवेढा पंढरपूरसह मोहोळ तालुक्यातील सभासदाच्या उसाचेही गाळप होणार
मंगळवेढा : कचरेवाडी (ता.मंगळवेढा) येथील युटोपियन शुगर्स कारखान्याच्या आठव्या गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व रोहन परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाले .प्रारंभी कारखान्याचे सिव्हिल इंजिनियर .अनिल भोसले यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
यावेळी चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की, मागील सात ही हंगामात युटोपियन ने भरीव कामगिरी केली आहे.चालू आठव्या गळीत हंगामात ६.५० लाख मे.टन ऊसाचे क्रसिंग करून ऊसाच्या रसापासुन व बी हेवी मोलॅसेस पासून १.५० कोटी लिटर इथेनॉल उत्पादित करणार आहे. चालू गळीत हंगामात ऊसाची उपलब्धता चांगली असून सर्व ऊस उत्पादक हे नियोजित नोंदणी प्रोग्रॅम नुसारच कारखान्यास ऊस देतील अशी मला अशा व्यक्त केली.
या गळीत हंगामात कारखान्याचे मार्गदर्शक आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या सुचने नुसार पंढरपूर-मंगळवेढा व मोहोळ या तालुक्यातील इतर कारखान्याच्या सभासदांचा संपूर्ण ऊस गाळप केला जाईल.त्यामुळे ऊस उत्पादकांनी चिंता न करता कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन ही परिचारक यांनी केले. कारखान्याने या वर्षी २०० ट्रॅक्टर, १५० मिनी ट्रॅक्टर,व २० बैलगाडी या प्रमाणे करार केले असून ही सर्व वाहने व तोडणी कामगार येत्या १५ ते१६ तारखेपर्यंत कार्यक्षेत्रामध्ये पोहोचतील याची खबरदारी कारखान्याने घेतली आहे.
संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना यंत्रणा सज्ज आहे. लवकरच मोळी पूजन करून गळीत हंगामास सुरुवात होईल. सर्व कामगार वर्ग हा चालू गळीत हंगाम यशस्वी करतील अशी खात्री परिचारक यांनी व्यक्त केली. तसेच कारखान्याच्या व्यवस्थापना मध्ये पुढील काळात रोहन प्रशांत परिचारक हे मदत करतील अशी अपेक्षा उमेश परिचारक यांनी व्यक्त केली. या घोषणेचे सर्वांनी उस्फुर्तपणे स्वागत केले. याप्रसंगी रोहन परिचारक, प्रगतशील बागायतदार महादेव लवटे, सुरेश टिकोरे यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी मानले.