व्यवस्थापकानेच पळविला जैन मंदिरातील ४ लाखांचा गल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:26 AM2021-09-24T04:26:25+5:302021-09-24T04:26:25+5:30
ही चोरीची घटना झाल्याचे समजताच या मंदिराचे ट्रस्टी विश्वस्त केवलचंद विमलचंद राठोड (वय ६१, रा.महावीर मार्ग, बार्शी) ...
ही चोरीची घटना झाल्याचे समजताच या मंदिराचे ट्रस्टी विश्वस्त केवलचंद विमलचंद राठोड (वय ६१, रा.महावीर मार्ग, बार्शी) यानी पोलिसात तक्रार देताच मंदिराचे व्यवस्थापक म्हणून काम करत असलेले हर्षिद जैन (रा.मंदसौर बेलिया, मध्यप्रदेश) व त्याचा मामा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या जैन मंदिराचे कामकाज पहाण्यासाठी ट्रस्ट असून यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर ९ विश्वस्त कामकाज पहात आहेत. त्यातील फिर्यादी हे सदस्य असून, यासाठी मंदिराच्या कामकाज व व्यवस्था पहाण्यासाठी मध्यप्रदेशातील या मामा-भाच्याची नियुक्ती करून ते मंदिराचा सर्व आर्थिक व्यवहार देणग्या स्वीकारणे याची देखभाल करत होते . १९ सप्टेंबर रोजी फिर्यादीने सकाळी जाऊन त्यांना आतापर्यंतचा जमा-खर्चाचा हिशेब मागितला असता त्यांनी तयार करून ४ वाजेपर्यंत हिशेब दाखवितो म्हणाले. त्यामुळे फिर्यादी दर्शन करून गेले. त्यानंतर परत आल्यानंतर मामा-भाचे दोघेही दिसले नाहीत . त्यामुळे चौकशी केली असता दोघेही रामलिंग मंदिराच्या दर्शनासाठी येडशीला गेल्याचे सांगितले .त्यानंतर बुधवारी रात्रीपर्यंत परत न आल्याने हा प्रकार इतर विश्वस्तांना सांगितला, त्यानंतर कार्यालयातील चाव्याचा तपास करून टेबलच्या कॅश ड्रॉवर उघडताच रक्कम नव्हती; पण पावती पुस्तकवरून तपासणी केल्यानंतर त्यांनी ३ लाख ९२ हजार रु.घेऊन गेल्याचे लक्षात आल्याने ही तक्रार दिली आहे. याचा पुढील तपास पोसई शिरसाट करत आहेत.