मंद्रूप पोलिसांची अवैध वाळूवर धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:22 AM2021-04-07T04:22:53+5:302021-04-07T04:22:53+5:30
दक्षिण सोलापूर : तालुक्यातील मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीना व भीमा नदीत चोरून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या मंद्रूप ...
दक्षिण सोलापूर : तालुक्यातील मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीना व भीमा नदीत चोरून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या मंद्रूप पोलिसांनी आवळल्या आहेत. मार्च महिन्यात एकूण सात गुन्हे दाखल करून एकूण १३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात वाळू, टेम्पो, ट्रॅक्ट्रर-ट्राॅली आदींचा समावेश आहे. यात एकूण सतरा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डाॅ. नितीन थेटे व पोलीस कर्मचारी रात्रगस्त घालत असताना सीना नदीतून अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले, तसेच भीमा नदीतून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टर, एक टेम्पो, एक ट्रक पकडला आहे. एकूण ११ वाहने १२ ब्राॅस वाळूसह एकूण साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण सतरा आरोपींवर मंद्रूप पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी १७ आरोपींवर गुन्हा दाखल झाल्याने या धडक कारवाईमुळे वाळूमाफियांत खळबळ उडाली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डाॅ. नितीन थेटे व मंद्रूपच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
----
०६ मंद्रूप सँड
---
मंद्रूप येथे अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो, ट्रक व
ट्रॅक्टर, वाळू मंद्रूप पोलिसांनी जप्त केली आहे.