करमाळा पोलिसांकडून मांडुळाची तस्करी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:35 AM2020-12-14T04:35:15+5:302020-12-14T04:35:15+5:30
पोलीस हवालदार सोमनाथ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले,मिळालेल्या माहितीनुसार शेलगाव (वांगी) गावच्या शिवारात जेऊर ते शेलगाव जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या ...
पोलीस हवालदार सोमनाथ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले,मिळालेल्या माहितीनुसार शेलगाव (वांगी) गावच्या शिवारात जेऊर ते शेलगाव जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या बाजूला सुभाष जालिंदर आरकिले (रा.वांगी नं.१) हा मांडुळ प्राणी पकडून तो विक्रीसाठी घेऊन फिरत आहे. त्यानुसार आम्ही खासगी वाहनाने घटनास्थळी पोहोचलो. त्या ठिकाणी एकूण ४ व्यक्ती होत्या. या सर्वांना पंच व पोलिसांनी घेराव घालून पकडण्याचा प्रयत्न केला असता तीन व्यक्ती पळून गेल्या. एका व्यक्तीला पकडून त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने सुभाष जालिंदर आरकिले (वय ४०, रा.वांगी नं.१, ता.करमाळा) असे नाव सांगितले. त्याच्याजवळ एक लाल रंगाची कापडी पिशवी होती. ती पिशवी सहा. पोलीस निरीक्षक भुजबळ यांनी पाहिली असता त्यामध्ये एक काळ्या रंगाचे दोन तोंडाचे मांडुळ प्राणी मिळून आला. सुभाष आरकिले याला हा मांडुळ कशासाठी आणला आहे, असे विचारले असता त्याने मांडुळ हा विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. त्यावेळी भुजबळ यांनी सुभाष आरकिले याची तपासणी केली असता त्याच्याजवळ १ लाख रुपये किमतीचे एक काळ्या रंगाचे दोन तोंडे असलेला मांडुळ, ५ हजार रुपये किमतीचा व एक ३ हजार रुपयांचा किमतीचा मोबाईल, ११७० रुपये रोख रक्कम व ३० हजार रुपये किमतीची एमएच ४५ पी ४५३० या क्रमांकाची दुचाकी असा एकूण १ लाख ३९ हजार १७० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.