मंगलपल्ली आत्महत्या प्रकरण: पुलगम, चिप्पा अन् कामुनीसह १९ जणांवर गुन्हा दाखल

By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 14, 2023 12:14 PM2023-01-14T12:14:40+5:302023-01-14T12:15:28+5:30

याप्रकरणी किरणची पत्नी सुमलता मंगलपल्ली हिने फिर्याद दिली आहे.

mangalpalli suicide case registered against 19 persons including pulgam chippa and kamuni | मंगलपल्ली आत्महत्या प्रकरण: पुलगम, चिप्पा अन् कामुनीसह १९ जणांवर गुन्हा दाखल

मंगलपल्ली आत्महत्या प्रकरण: पुलगम, चिप्पा अन् कामुनीसह १९ जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: मॅक्स क्रिप्टो घोटाळ्यात किरण मंगलपल्ली आत्महत्या प्रकरणी टेक्स्टाईल उद्योजक पुलगम यांच्यासह १९ जणांवर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी किरणची पत्नी सुमलता मंगलपल्ली (वय ३५, रा. न्यू पाच्छा पेठ, साईबाबा चौक) हिने फिर्याद दिली आहे.

मॅक्स क्रिप्टो ॲपद्वारे दामदुप्पट डॉलर योजनांचे आमिष दाखवल्यानंतर अनेकांनी यात मोठी गुंतवणूक केली. मॅक्स क्रिप्टो ॲपचा व्यवहार किरण मंगलपल्ली हा बघायचा. ॲप अचानक बंद पडल्यानंतर गुंतवणूकदारांनी किरणच्या मागे पैशांसाठी तगादा लावला, असे किरणने त्याच्या सुसाइड नोटमध्ये लिहिले असून, नोटमधील माहितीची पोलिस तपास करत आहेत.

किरण मंगलपल्ली याने सांगलीच्या लॉजवर १० डिसेंबर रोजी विष घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याच्या लॉजवर एक सुसाइड नोट सापडली. यात एकूण १९ जणांची नावे आहेत. १९ जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुसाइड नोटमध्ये आहे. सुसाइड नोटमधील १९ जणांवर कारवाई करण्याची मागणी किरण याची पत्नी सुमलता मंगलपल्ली हिने जेलरोड पोलिसांकडे केली. तशी फिर्याद त्यांनी पोलिसांकडे दिली आहे. 

यांच्यावर गुन्हा दाखल

पूर्वभागातील टेक्स्टाईल उद्योजक नित्यानंद पुलगम, नीलेश वाघमोडे, गिरीश चिप्पा, तुषार चिप्पा, अन्वर छुरी, श्रीकांत बसाटे, विगेश्वर कोंपेल्ली, पोशेट्टी येमुल, कृष्णा आडम, श्रीनिवास मिसालोलू, प्रवीण चिप्पा, अमर मोठे, विशाल मिठ्ठा, राहुल कुरापाटी, विनोद कामुनी, ऋषी महेश्वरम, अमर एक्कलदेवी, मोतीलाल गुंगाळ, गणेश आडम (सर्व रा. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mangalpalli suicide case registered against 19 persons including pulgam chippa and kamuni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.