मंगळवेढा पं. स. शिक्षण विभागाकडे तीन अधिकारी नव्याने दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:26 AM2021-09-05T04:26:51+5:302021-09-05T04:26:51+5:30
मरवडे येथे विस्तार अधिकारी दिलीप चव्हाण हे नव्याने आले आहेत. ब्रह्मपुरी केंद्राकडे केंद्रप्रमुख म्हणून माळशिरस येथून विष्णू धोत्रे ...
मरवडे येथे विस्तार अधिकारी दिलीप चव्हाण हे नव्याने आले आहेत. ब्रह्मपुरी केंद्राकडे केंद्रप्रमुख म्हणून माळशिरस येथून विष्णू धोत्रे हे बदलून आले आहेत. ते मूळचे डोणज येथील असून, नोकरीची सुरुवात मंगळवेढा येथे झाली होती. सेवानिवृत्तीच्या तोंडावर ते पुन्हा आपल्या तालुक्यात आल्याचे सांगण्यात आले. पाटखळ केंद्राकडे ईश्वर भोसले, आंधळगाव केंद्राकडे विष्णू चव्हाण हे सांगोल्याहून आले आहेत. मरवडे केंद्राकडे बिभीषण रणदिवे हे अधिकारी आले आहेत.
मागील सहा वर्षापासून मंगळवेढ्याला गटशिक्षणाधिकारी न भेटल्यामुळे हे पद रिक्त आहे. सध्या प्रभारी गटशिक्षण अधिकाऱ्यावरच तालुक्याच्या शिक्षणाचा कारभार उत्तमरीतीने सुरू आहे. तालुक्यात १३ पदे केंद्र प्रमुखाची असून, यापैकी सहा पदांवर अधिकारी कार्यरत आहेत, तर ७ पदे अद्यापही रिक्तच आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून १४ मुख्याध्यापक पदे अद्यापही रिक्त आहेत. शासनाने मंगळवेढ्यातील विविध रिक्त पदे तत्काळ भरून होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी नागरिक व पालकांतून होत आहे.
मुख्यालयात राहणे बंधनकारक
नव्याने आलेले अधिकारी मुख्यालयात न राहता अपडाऊन करीत आहेत. शासनाच्या नियमानुसार अधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी याकामी लक्ष घालण्याची गरज आहे.