मांगीत बागल प्रतिष्ठान उभारतेय ५० बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:16 AM2021-04-29T04:16:46+5:302021-04-29T04:16:46+5:30
करमाळा : तालुक्यातील कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेत, मांगी (ता. करमाळा) येथे स्व. दिगंबरराव बागल प्रतिष्ठानतर्फे ५० बेडचे कोविड ...
करमाळा : तालुक्यातील कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेत, मांगी (ता. करमाळा) येथे स्व. दिगंबरराव बागल प्रतिष्ठानतर्फे ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले जात आहे.
मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे स्व. दिगंबरराव बागल प्रतिष्ठान संचालित प्रगती विद्यालय, मांगी येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी मागितली आहे.
या कोविड केअर सेंटरचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, रश्मी बागल यांनी कामाची पाहणी केली. येत्या काही दिवसात मांगी येथे हे कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे. यासाठी मुख्याध्यापिका अनुपमा बागल-देवकर, आदेश बागल, ग्रामसेवक मोकाशी, ढवळे, किरण गायके हे परिश्रम घेत आहेत.
-----
फोटो : २७ मांगी
मांगी येथे उभारले जात असलेल्या कोविड सेंटरची पाहणी रश्मी बागल, दिग्विजय बागल व अधिकाऱ्यांनी केली.