सरकारी कार्यालयात मनीमाऊ करते चोवीस तास ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:20 AM2020-12-24T04:20:12+5:302020-12-24T04:20:12+5:30
दोन वर्षांपूर्वी कुणीतरी रस्त्यावर सोडून दिलेली मनीमाऊ एकेदिवशी कार्यालयात आली अन् कर्मचाऱ्यांच्या प्रेमाखातर आपला मुक्काम कार्यालयातच कायम केला. कार्यालयाच्या ...
दोन वर्षांपूर्वी कुणीतरी रस्त्यावर सोडून दिलेली मनीमाऊ एकेदिवशी कार्यालयात आली अन् कर्मचाऱ्यांच्या प्रेमाखातर आपला मुक्काम कार्यालयातच कायम केला. कार्यालयाच्या सर्व विभागात ही मनीमाऊ बिनधास्तपणे वावरते. ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्येही तिची लुडबूड असते. आसपासच्या शेतात फिरून शिकारीबरोबरच कार्यालयातील उंदरांचाही बंदोबस्त करत जेवणाच्या सुटीत कर्मचाऱ्यांबरोबर आपली न्याहरीही घेते, असा तिचा दिनक्रम ठरलेला असतो.
लॉकडाऊन काळातच चिंताग्रत
कोरोना महामारी, संचारबंदी काळात कार्यालयातील वर्दळ पूर्णपणे ठप्प झाली होती. या काळातच मनीमाऊला चुकल्यासारखे वाटे. कार्यालयात कर्मचारी येण्याची वाट बघत बसे. तिला दूध, चपाती, बिस्कीट खायला देऊन कार्यालय पुन्हा बंद होत असे. या काळात माणसांची वर्दळ थांबल्यामुळे मनीमाऊ चिंताग्रस्त दिसत होती.
कोट ::::::::::::::::::::::::::::::
आमचं कार्यालय शेतात असल्यामुळे या कार्यालयात पूर्वी उंदरांपासून त्रास होत होता. मांजर इथं असल्यापासून कार्यालयाकडे कधीही उंदरं फिरकले नाहीत. त्याला सवय लागल्यामुळे सर्व कार्यालयात मांजर बिनधास्तपणे वावरते.
- गजानन ननावरे
तालुका कृषी अधिकारी
फोटो ::::::::::::::::::::
माळशिरस तालुका कृषी कार्यालयासमोर बसून असलेली मनीमाऊ.