श्रीनाथ विद्यालयातील स्पर्धेत मंजू जमदाडे ठरल्या अहिल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:22 AM2021-01-20T04:22:40+5:302021-01-20T04:22:40+5:30
यावेळी सुनीता ठोंबरे, ताई वावरे, अन्नपूर्णा माने, प्रियंका देवकर, नीलम घाडगे, माधुरी बोत्रे, आदी महिला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित ...
यावेळी सुनीता ठोंबरे, ताई वावरे, अन्नपूर्णा माने, प्रियंका देवकर, नीलम घाडगे, माधुरी बोत्रे, आदी महिला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महिलांमध्ये जागृती व्हावी. महिलांनी एकत्र यावे या उद्देशाने महिलांसाठी हळदी-कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला. विजेत्या महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, नीलेश घाडगे, महेश बोत्रे, रावसाहेब देशमुख, प्राचार्य योगेश गुजरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महिला, पालक उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते...
पाककला स्पर्धा मंजू जमदाडे (प्रथम), श्रद्धा पोरे (द्वितीय), खाऊगल्ली स्पर्धा शीला राऊत (प्रथम), पूजा लोंढे (द्वितीय), संगीत खुर्ची स्पर्धा हिना भोना (प्रथम), अश्विनी खांडेकर (द्वितीय). प्रश्नमंजुषा स्पर्धेत महेश क्लॉथ सेंटरच्या सौजन्याने पैठणी देऊन अहिल्या होण्याचा मान मंजू जमदाडे यांना मिळाला. यामध्ये प्रत्येकाला विद्यालयाकडून सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल देऊन गौरव करण्यात आले.