माणकी-कोकरेस्ती रस्त्याला माजी सरपंचांकडून स्वखर्चातून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:17 AM2021-06-04T04:17:52+5:302021-06-04T04:17:52+5:30
माळशिरस : मानकी-कोकरेवस्ती रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत होते. मात्र ...
माळशिरस : मानकी-कोकरेवस्ती रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत होते. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी मानकी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुकुमार माने यांनी स्वखर्चातून रस्त्याच्या मुरमीकरण कामाची सुरुवात केली.
माणकी (ता. माळशिरस) ग्रामपंचायत हद्दीतील कोकरेवस्ती येथील रस्त्याच्या रुंदीकरण, मुरुमीकरणाचे काम सरपंच सुकुमार माने व पैलवान तानाजी रणनवरे हे स्वखर्चातून करणार आहेत. लॉकडाऊन काळात पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्यांचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. हा रस्ता दुरुस्त झाल्यास नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
याप्रसंगी किसन रणनवरे, पांडुरंग रणनवरे, अशोक रणनवरे, यशवंत रणनवरे, सतीश रणनवरे, हणुमंत बोडरे, श्रीराम रणनवरे, बापू रणनवरे उपस्थित होते.