मनोज जरांगे पाटलांचा सोलापूरकरांना ओदश; सकल मराठा समाजाकडून उपोषण स्थगित
By बाळकृष्ण दोड्डी | Published: November 6, 2023 12:26 PM2023-11-06T12:26:11+5:302023-11-06T12:27:05+5:30
पुढील आदेश आल्यानंतर उपोषणाची दिशा ठरवू, असे सकल मराठा समाजाने जाहीर केले आहे.
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सोलापुरात सुरू असलेला साखळी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. समाजाचे नेते मनोज जरांगे पाटलांच्या आदेशानंतर पूनम गेटवरील साखळी उपोषण तेराव्या दिवशी म्हणजे सोमवारी, ६ नाेव्हेंबर रोजी स्थगित करत आहोत, अशी घोषणा सकल मराठा समाजाचे माऊली पवार तसेच प्रा. गणेश देशमुख यांनी उपोषणस्थळी केली.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात देखील तेरा दिवसांपूर्वी सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू झाले. यास चांगला प्रतिसाद मिळाला. सरकारच्या विनंतीनंतर जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले. त्यांनी राज्य सरकारला दोन महिन्याचा वेळ दिला आहे. त्यांच्याकडून पुढील आदेश आल्यानंतर उपोषणाची दिशा ठरवू, असे सकल मराठा समाजाने जाहीर केले आहे.