"मराठा चळवळीला गालबोट लावू नका, जरांगेंचा सोशल मीडिया रोहित पवार..."राजेंद्र राऊतांचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 03:25 PM2024-09-09T15:25:41+5:302024-09-09T15:27:15+5:30
Rajendra Raut, Manoj Jarange Patil : आमदार राजेंद्र राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले.
Rajendra Raut, Manoj Jarange Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजपाचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल जरांगे पाटील यांनी बार्शीत माझी बाजू घेणाऱ्या तरुणाला राजेंद्र राऊत यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. दरम्यान, आज भाजपा आमदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.
अजित पवार कुठेत? अमित शाहंसोबत शिंदे फडणवीस लालबागच्या दर्शनाला आले, दादा मुंबईतच पण...
"जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी स्थापन होत होती, तेव्हा तीच त्याला उघड विरोध केला होता, तुम्हीच उपोषण सोडत असताना खुलासा केला होता. आता नेमकं माझं काय चुकलं? तुम्ही माझ्यावर बोलत आहात. मी आणि माझ्या तालुक्यातील काही मराठा बांधवांनी प्रश्न केले म्हणून तुम्ही मला बोलायला लागले. माझ्या तालुक्यातील लोकांना काही संशय आला आहे, त्याच उत्तर द्या. तुम्ही हे करण्यापेक्षा बघतो, दारातच सभा घतो, ताईला सांगा, वडिलांना सांगा. एवढा अहंकार असू नये, रावणाची लंकाही राहिलेली नाही, दुर्योधनाचे काय झाले आहे सर्वांना माहिती आहे, एवढा अहंकार कामाचा नाही, असंही राजेंद्र राऊत म्हणाले.
'आम्हीही जशास तसे उत्तर देणार'
"मनोज जरांगे पाटील यांना कोणीही प्रश्न विचारला तरीही हे एकेरीची भाषा करतात. बघतो, ठेवतो, पाडतो, दाखवतो बोलतात. तुम्ही मुख्यमंत्री, आमदरांना शिव्या देताय. तुम्हाला मराठा चळवळ अखंडपणाने पुढे न्यायची आहे की यातून वेगळे काहीतरी साध्या करायचे आहे?, असा सवालही राऊत यांनी केला. मी कधीही खोट बोलणार नाही, या ठिकाणी यांच्याविरोधात कुणीही आवाज उठवला तरी त्यांच्याविरोधात लगेच फोन सुरू होतात. यांनी सगळा सोशल मीडिया फीट करुन ठेवला आहे. याचा सोशल मीडिया रोहित पवार यांच्याकडून केला जातो, असा गंभीर आरोपही राजेंद्र राऊत यांनी केला. प्रामुख्याने परभणी, बीड, जालना या ठिकाणी यांचे केंद्र बिंदू आहे ही माहिती आम्हाला मिळाली आहे. यांच्याविरोधात कोणी प्रश्न विचारला की लगेच फोन सुरू होतात. मलाही सुरू झालेत. मी माझ्या स्टाईलने उत्तरे दिली आहेत. हे आता बंद करा, आम्हीही जशास तसे उत्तर देणार. मराठा एक चळवळ आहे या चळवळीला गालबोट लावू नका, असंही राजेंद्र राऊत म्हणाले.