मनोज पाटील सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नवे पोलीस अधिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:11 AM2018-07-28T11:11:44+5:302018-07-28T11:14:45+5:30
सोलापूर : ठाणे शहर पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले मनोज पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे़ पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू यांची बदली झाल्याने मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे़
राज्यातील ९५ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाºयांच्या बदल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केल्या. त्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे़ पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू यांची मुंबई येथे वाहतुक शाखेत तर सोलापूर शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेले नामदेव चव्हाण यांची जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे़ याशिवाय पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांची औरंगाबाद राज्य गुप्त वार्ता विभागात नियुक्ती करण्यात आली आहे़
सोलापूरातील या अधिकाºयांची झाली बदली
- एस़ विरेश प्रभू (सोलापूर ग्रामीण पोलीस दल पोलीस अधिक्षक - अप्पर पोलीस आयुक्त, वाहतुक, मुंबई शहर)
- एन. डी. चव्हाण (सोलापरू शहर पोलीस उपायुक्त - जालना पोलीस प्रशिक्षण केंद्र प्राचार्य नियुक्ती),
- अपर्णा गीते (सोलापूर शहर पोलीस उपायुक्त - औरंगाबाद राज्य गुप्त वार्ता विभाग नियुक्ती)
- निखील पिंगळे (सोलापूर ग्रामीण सहायक पोलीस अधीक्षक - वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती),
सोलापूरात हे अधिकारी रूजू होणार
- मनोज पाटील (ठाणे शहर पोलीस उपायुक्त - सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक नियुक्ती),
- मधुकर गायकवाड (औरंगाबाद राज्य गुप्त वार्ता विभाग उपायुक्त - सोलापूर शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती)
- विशाल सिंगुरी (बिड सहायक पोलीस अधीक्षक - सोलापूर अप्पर पोलीस अधीक्षक नियुक्ती),
- एस. एच. महावरकर (मुंबई राज्य गुप्त वार्ता विभाग उपायुक्त - सोलापूर शहर पोलीस उपायुक्त नियुक्ती),