मनपात कागदी घोडे नाचविण्याचा कार्यक्रम भोंगळ कारभार

By admin | Published: May 30, 2014 01:08 AM2014-05-30T01:08:16+5:302014-05-30T01:08:16+5:30

हत्तुरे वस्तीच्या शाळेला २२ वर्षांपासून कर आकारणी नाही

Mantap Paper Horse Dancing Program | मनपात कागदी घोडे नाचविण्याचा कार्यक्रम भोंगळ कारभार

मनपात कागदी घोडे नाचविण्याचा कार्यक्रम भोंगळ कारभार

Next

सोलापूर : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार सांगितल्याशिवाय कामच करायचे नाही, असा जणू पायंडाच मनपामध्ये पडू लागला आहे़ आयुक्तांनी अधिकार्‍यांना पळायला लावले; मात्र अनेक खात्यात ‘पाट्या टाकण्याचे’ काम सुरू आहे़ हत्तुरे वस्तीमधील आप्पासाहेब हत्तुरे यांच्या शाळांना व्यावसायिक दराने कर आकारणी करा, संबंधित कर्मचार्‍यांवर फौजदारी करा, असे आदेश होऊन वर्षभर झाले तरीही यावर निर्णय झाला नाही़ हत्तुरे वस्तीमधील ही शाळा आहे़ नागूबाई आप्पासाहेब हत्तुरे, राजश्री श्रीशैल हत्तुरे यांच्या नावे मल्लिकार्जुन नगरात प्लॉट क्रमांक ९६, स्वामी विवेकानंद नगरात प्लॉट क्रमांक ४३ तसेच प्लॉट नंबर २८१ मजरेवाडी आदी ठिकाणची ही मिळकत दाखविण्यात आली आहे़ प्रकरण पाहिल्यावर नक्की काय भानगड आहे, कोणाच्या मिळकतीचा वाद आहे हे देखील लक्षात येत नाही़ वस्तुनिष्ठ माहिती देण्याऐवजी हद्दवाढ विभाग, सामान्य प्रशासन विभाग केवळ कागदी घोडे नाचवित आहे़ त्यामुळे ३१ मे २०१३ रोजी हे प्रकरण उजेडात येऊन वर्ष उलटले तरीही यावर प्रशासनाने निर्णय घेतला नाही, हे दुर्दैव़ केवळ चालढकल करणे वारंवार पत्र पाठवून हात झटकून टाकणे, असा कारभार सुरू असल्यामुळे प्रत्यक्षात काम होत नाही़ हद्दवाढ विभागातील त्या भागाचा वसुली कारकून कोण याची माहिती मिळविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला तब्बल चार पत्रे पाठवावी लागतात तरीही चुकीची माहिती मिळते, त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली जाते, तरीही अधिकारी शांतपणे काम करतात हे दुर्दैव़ लाखो रुपयांचा कर या प्रकरणातून मनपाला मिळू शकतो, मात्र प्रत्येक बाबीमध्ये चालढकल सुरू आहे़ त्या शाळेला घरगुतीऐवजी व्यावसायिक कर आकारणी करा, दुर्लक्ष करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करा, असे आदेश तत्कालीन आयुक्त अजय सावरीकर यांनी दिले असताना आजवर ठोस निर्णय झाला नाही़

-------------------------- ..

.याकडे लक्ष द्या !

शहरातील अनेक मिळकतींना नाही कर आकारणी रिकाम्या प्लॉटवर वेळेवर आकारणी नाही मोठी थकबाकी वसुलीसाठी विशेष माहिती नाही शहरात पाच लाखांवर मिळकती, नोंद मात्र १ लाख ८० हजारांची विविध खात्यात समन्वय नसल्यामुळे कर आकारणीला फटका

--------------------------------

हद्दवाढ विभागाकडून व्यवस्थित माहिती दिली जात नसल्यामुळे कारवाई करण्यास विलंब होत आहे़ आता त्या शाळांनी कधीपर्यंत कर भरला, त्यांच्याकडून व्यावसायिक दराने किती कर येणे बाकी आहे, कोणत्या कर्मचार्‍यांनी हलगर्जीपणा केला, याची माहिती घेऊन लवकरच कारवाई करण्यात येईल़ -अमिता दगडे-पाटील मनपा सहायक आयुक्त

Web Title: Mantap Paper Horse Dancing Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.