बार्शीत महिनाभरात तब्बल २६ जणांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:43 AM2020-12-05T04:43:20+5:302020-12-05T04:43:20+5:30
बार्शी शहर, तालुका, वैराग, पांगरी या चार पोलीस ठाण्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक ११ ...
बार्शी शहर, तालुका, वैराग, पांगरी या चार पोलीस ठाण्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक ११ आत्महत्येची नोंद ही बार्शी शहरात झाली आहे़ वैराग हद्दीत ७, पांगरीमध्ये ३ आणि तालुका पोलीस स्टेशनमध्ये ५ अशा एकूण २६ आत्महत्या झाल्या आहेत़ यामध्ये प्राधान्याने गळफास घेऊन, विषप्राशन करून व विहिरीत उडी मारून केलेल्या आत्महत्येचा समावेश आहे़ यातील ३ या आर्थिक अडचणींमुळे, २ दीर्घ आजाराला कंटाळून, पाच व्यसनाधीनतेमुळे व पाच आत्महत्या या सावकाराच्या कर्जाला कंटाळून झाल्या आहेत़ मात्र, त्याची तशी पोलीस स्टेशनला नोंद नाही़ उर्वरित आत्महत्या या घरगुती वादातून किंवा अज्ञात कारणाने झाल्या आहेत़ या २६ जणांमध्ये १० महिला तर १६ पुरुषांचा समावेश आहे़ यातील १० जण हे २० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत, ही बाब चिंताजनक आहे़
कोट :::
आजचा तरुण सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत गुरफटत चालला आहे़ त्याचा जवळच्या व्यक्तीशी असलेला संवाद हा कमी होत चालला आहे़ ज्यावेळी तो अडचणीत येतो तेव्हा त्याला मनमोकळे करण्यासाठी कोणीच नसते़ त्यामुळे युवकांनी या आभासी दुनियेतून बाहेर पडून आपला मित्र परिवार, कुुटुंब व नातलग यांच्याशी घट्ट नाते जोडावे. मन मोकळे करावे.
- विजय राऊत
अध्यक्ष, जय शिवराय प्रतिष्ठान
डॉ़ संतोष बिनवडे