औषधनिर्माण शास्त्रच्या २५ हजार जागांसाठी तब्बल ७५ हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:25 AM2021-09-22T04:25:30+5:302021-09-22T04:25:30+5:30
तंत्रशिक्षण संचालनालयाने १५ सप्टेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमासाठी ७५ हजारांपेक्षा जास्त ...
तंत्रशिक्षण संचालनालयाने १५ सप्टेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमासाठी ७५ हजारांपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत व महाराष्ट्र राज्यातील पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ही फक्त २५ हजार आहे, असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी व्यक्त केले. कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विभागाला व ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी वाढता कल हा ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त दिसत आहे. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये झुंबड उडणार आहे, असे मत प्रा. झोळ यांनी व्यक्त केले.
..........
सध्या संपूर्ण भारत देशामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषधनिर्माण शास्त्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण पदविका औषध निर्माण शास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःचे मेडिकलचे दुकान व त्याचबरोबर मॉलही उघडता येतो, तसेच भारत देशातून इतर देशांना औषधांची निर्यात होत असल्याने औषध निर्माण कंपन्यांची संख्या भारत देशात वाढत आहेत. त्यामुळे विविध औषधनिर्माण कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा फार्मसी क्षेत्राकडे कल जास्त आहे.
- प्रा. रामदास झोळ