पक्ष आमचे अनेक.. शेतकऱ्यांसाठी जात एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:20 AM2021-03-20T04:20:46+5:302021-03-20T04:20:46+5:30

वीजबिलामुळे वीजपुरवठा खंडित करणार नाही, असे सांगणाऱ्या सरकारने अधिवेशन संपताच वीजबिल वसुलीची मोहीम हाती घेतल्याने शेतकऱ्यांबरोबर आकसाने वागत असल्याचा ...

Many of our parties .. one for the farmers | पक्ष आमचे अनेक.. शेतकऱ्यांसाठी जात एक

पक्ष आमचे अनेक.. शेतकऱ्यांसाठी जात एक

Next

वीजबिलामुळे वीजपुरवठा खंडित करणार नाही, असे सांगणाऱ्या सरकारने अधिवेशन संपताच वीजबिल वसुलीची मोहीम हाती घेतल्याने शेतकऱ्यांबरोबर आकसाने वागत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केला आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत आजिनाथ परबत, दिनेश गायकवाड, महावीर सावळे, सिद्धेश्वर घुगे, पिंटू आतकरे यांच्यासह शेकापचे ॲड. बाळासाहेब पाटील, बाळासाहेब पवार, शिवसेनेचे शंभू साठे, संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे, भारत नाना पालकर, आबा साठे, मालोजी अडकर, किशोर शिंदे, विलास चवरे, अण्णा खंडागळे, महादेव जगदाळे, रामभाऊ भांगे, शरद भांगे, गोमटेश सावळे, जयश्री रायजदे, वैभव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना फटका

वीजबिल प्रश्नावर आंदोलन सुरू असताना तहसीलदार राजेश चव्हाण व उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनादेखील आंदोलनाचा फटका बसला. आंदोलन स्थळापासून रस्ता बदलून पुढील कामकाजासाठी त्यांना मार्गस्थ व्हावे लागले.

१९माढा-शेतकरी आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करताना शेतकरी.

Web Title: Many of our parties .. one for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.