अनेक गावांत जुन्या गटातील नेतृत्वात खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:12 AM2021-01-08T05:12:37+5:302021-01-08T05:12:37+5:30

कुर्डू ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. येथे जयंत पाटील यांच्या विरोधात अण्णासाहेब ढाणे यांचा गट आमनेसामने ...

In many villages the leadership of the old group shrugged | अनेक गावांत जुन्या गटातील नेतृत्वात खांदेपालट

अनेक गावांत जुन्या गटातील नेतृत्वात खांदेपालट

Next

कुर्डू ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. येथे जयंत पाटील यांच्या विरोधात अण्णासाहेब ढाणे यांचा गट आमनेसामने आहे. दोघांनीही सगळ्या जागेवर उमेदवार उभे केले असून गावात चार अपक्ष उमेदवारही आपले भाग्य अजमावत आहेत. येथील संदीप पाटील व उमेश पाटील यांच्यातील लढाईही लक्षवेधी आहे. मोडनिंबमध्ये राष्ट्रवादीच्या कैलास तोडकरी यांच्या शहर विकास आघाडीविरोधात शिवसेनेचे शिवाजी सुर्वे यांची सर्वपक्षीय लोकशाही आघाडी थेट लढत देत आहे. यातच मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनीही यंदा उडी घेतली आहे. येथूनच सात अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

उपळाई (बु) या १५ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या गावांतून अनेक समीकरणे बदलून निवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीच्या दादासाहेब नागटिळक व सीताराम गायकवाड यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे दीपक देशमुख यांच्या गटात लक्षवेधी लढत लागली आहे. पूर्वीचा गावपातळीवरील राष्ट्रवादीचा गट सोडून महविकास आघाडी गटात अजितसिंह देशमुख, मल्लिकार्जुन झाडबुके व बेडगे गट हा सामील झाल्याने चुरस निर्माण झाली आहे. येथे तीन अपक्ष आहेत. मानेगाव येथील ग्रामपंचायत वाॅर्ड क्रमांक दोनची तिरंगी लढत सोडून इतर सर्व वाॅर्डांत दुरंगी लढत लागली आहे. या लढतीत माजी उपसभापती उल्हास राऊत यांच्या गटाला नीलकंठ पाटील, अजय देशमुख व बाबा पारडे यांच्या गटाने थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे येथे चुरशीचा सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे. लऊळ ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे माजी उपसभापती प्रतापराव नलवडे यांच्या गटाविरोधात शिवसेनेच्या महालिंग देवकर यांच्या गटाची थेट निवडणूक लागली आहे.

वाकावमध्ये सावंत विरुद्ध शिंदे गटात लढत

शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांच्या वाकाव ग्रामपंचायतमध्ये यंदा नऊच्या नऊ जागेवर आ. बबनराव शिंदे यांच्या भारत खंडागळे व माणकोजी भुसारे यांच्या गटाने थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे तेथील निवडणूकही चुरशीने होत आहे.

Web Title: In many villages the leadership of the old group shrugged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.