म्हैसाळच्या पाण्यामुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:22 AM2021-04-04T04:22:50+5:302021-04-04T04:22:50+5:30
म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून सांगोला तालुक्यातील आठ गावांना पोटकॅनाॅल व बंदिस्त कुपनलिकेतून हे पाणी येणार आहे. यामध्ये सांगोला वितरिका क्र. ...
म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून सांगोला तालुक्यातील आठ गावांना पोटकॅनाॅल व बंदिस्त कुपनलिकेतून हे पाणी येणार आहे. यामध्ये सांगोला वितरिका क्र. १ व २ असे दोन टप्पे आहेत. वितरिका क्र. १ ही संपूर्ण बंदिस्त पाईपलाईन असून वितरिका क्र. २ मध्ये १९ कि.मी. चा पोटकॅनाॅल तर ३२ कि.मी. बंदिस्त पाईपलाईन आहे. सध्या वितरिका क्र. १ पूर्ण झाली असून शुक्रवारी १३ कि. मी. मुख्य लाईनमधून या पाण्याची चाचणी घेण्यात आली.
याप्रसंगी सरपंच चंद्रकांत करांडे, विकास संस्थेचे चेअरमन मुरलीधर करांडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक करताडे, ग्रा.पं.सदस्य मधुकर करताडे, ग्रा.पं.सदस्या जिजाबाई करांडे, कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, कनिष्ठ अभियंता सुहास पवार, ठेकेदार पाटील आदी उपस्थित होते.
नऊ गावे होणार सुजलाम् सुफलाम्
वितरिका क्र. १ मधून सांगोला डिकसळ व जत-लोहगाव लाभ क्षेत्रातील २ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तर वितरिका क्र. २ मधून सांगोला तालुक्यातील पारे, नराळे, हबिसेवाडी, हंगिरगे, घेरडी, गावडेवाडी, मानेवाडी या भागातील ३२०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने हा भाग सुजलाम् सुफलाम् होणार आहे.
कोट :::::::::::::
माजी आ. दीपक साळुंखे-पाटील यांच्या प्रयत्नातून आज प्रत्यक्षात डिकसळमध्ये कृष्णामाई अवतरली आहे. केवळ त्यांच्यामुळे पाण्यासाठीचा संघर्ष पूर्णत्वासही गेला आहे. म्हैसाळच्या पाण्याचा गावामधील ७५ टक्के भागाला लाभ होणार आहे.
- चंद्रकांत करांडे
सरपंच, डिकसळ
फोटो ओळ :::::::::::::::::::
म्हैसाळ योजनेतून सांगोला वितरिका क्र. १ मधून डिकसळ गावात पाणी दाखल झाल्याचे छायाचित्र.