प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी; सोलापुरातील मराठा वधू -वर परिचय मेळाव्यात ठराव 

By Appasaheb.patil | Published: May 28, 2023 03:44 PM2023-05-28T15:44:23+5:302023-05-28T15:44:52+5:30

मराठा सेवा संघ प्रणित मराठा वधू वर कक्षाच्या वतीने रविवारी शिवस्मारक सभागृह वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Maratha community ban on pre-wedding shooting; Maratha Brides in Solapur - Decide on an Introduction Gathering | प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी; सोलापुरातील मराठा वधू -वर परिचय मेळाव्यात ठराव 

प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी; सोलापुरातील मराठा वधू -वर परिचय मेळाव्यात ठराव 

googlenewsNext

सोलापूर : मराठा समाजातील मुला - मुलींचे विवाह करताना प्री वेडिंग शूटिंग करू नये असा ठराव मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा वधू वर मेळाव्यात करण्यात आला. या ठरावाला सर्व समाज बांधवांनी एकमताने मान्यता दिली. याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी आणि शासनाला जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून दिले आहे, त्यामुळे समाज बांधवांनी या ठरावाची पायमल्ली न करता  प्री वेडिंग शूटिंग ला पायबंद घालावा असा सूर देखील यावेळी मान्यवरांच्या भाषणातून निघाला.

मराठा सेवा संघ प्रणित मराठा वधू वर कक्षाच्या वतीने रविवारी शिवस्मारक सभागृह वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनकुडे - पाटील, जय हिंद शुगरचे चेअरमन बबुवान माने - देशमुख, शिवसेनेचे  जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा समन्वयक दत्तामामा मुळे जिल्हा उपाध्यक्ष जी. के. देशमुख,  सदाशिव पवार, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे , जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्ष नंदाताई शिंदे , मराठा नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश  काटोळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

दरम्यान, परिवहन सभापती राजन जाधव यांनी आपल्या भाषणात समाजासाठी अशा वधू वर मेळाव्याची गरज आहे. मात्र विवाह सोहळा जमवण्याच्या माध्यमातून होणाऱ्या दलालीला आळा बसला पाहिजे, त्यासाठी मराठा सेवा संघाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे  यांनी देखील मार्गदर्शन केले. समाजातील विवाह परिस्थिती भयानक आहे. आई-वडिलांनी  व्यापक अपेक्षा न करता कर्तृत्ववान आणि सुसंस्कार मुलगा पाहून विवाह करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.  जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली .आई-वडिलांनी आपल्या मुलाचा विवाह करताना कोणतीही अपेक्षा व्यक्त न करता सुसंस्कृत कर्तृत्ववान आणि संस्कारी मुलाची निवड करावी. साधेपणाने विवाह पार पाडावेत .विवाह सोहळ्याप्रसंगी केली जाणारी प्री वेडिंग शूटिंगवर पाय बंद घालावा .  तसा ठराव देखील या वधू वर मेळाव्यात केला गेला सर्व समाज बांधवांनी याला एकमताने पाठिंबा दिला.

Web Title: Maratha community ban on pre-wedding shooting; Maratha Brides in Solapur - Decide on an Introduction Gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.