लोकसभा आचारसंहितेपूर्वी मराठा समाज घेणार मोठा निर्णय; उद्या होणार सोलापुरात तातडीची बैठक

By Appasaheb.patil | Published: March 9, 2024 07:10 PM2024-03-09T19:10:57+5:302024-03-09T19:11:27+5:30

शिवाय निवडणुकीत राजकीय नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Maratha community to take big decision before Lok Sabha code of conduct; An urgent meeting will be held in Solapur tomorrow | लोकसभा आचारसंहितेपूर्वी मराठा समाज घेणार मोठा निर्णय; उद्या होणार सोलापुरात तातडीची बैठक

लोकसभा आचारसंहितेपूर्वी मराठा समाज घेणार मोठा निर्णय; उद्या होणार सोलापुरात तातडीची बैठक

सोलापूर : सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवाची तातडीची बैठक रविवार १० मार्च २०२४ रोजी शासकीय विश्राम गृह, सात रस्ता सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत समाजाची भूमिका काय असणार याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले. 

या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका ठरविण्यात येणार असून सगे सोयरे या शब्दासह ५० टक्के च्या आत ओबीसीमधून आरक्षण मिळावे म्हणून सरकार वर दबाव टाकण्यासाठी नवीन धोरण निश्चित करण्यात येणार आहे. नुकताच मनोज जरांगे यांनी आगामी निवडणुकीत निवडणुक आयोगाला कोंडीत पकडण्यासाठी वेगळी रणनिती आखण्याबाबत सुतोवाच केले होते. शिवाय निवडणुकीत राजकीय नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

एक पेपर घ्यायचा. मोठ्या अक्षरात लिहायचं, मी मतदार, पुढाऱ्यांनी माझ्या दारात यायचं नाही असं लिहून दाराला चिटकवून टाका. उद्यापासून राज्यात ही मोहिम सुरू करा. आपल्या दुचाकी, चारचाकीला तेच कागद चिटकवायचे. आता मतदान मागायला अमेरिकेत जाणार का? असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील एका सभेत नुकतेच समाजाला आवाहन केले तसेच सरकारवर निशाणा साधला होता. या सर्व बाबींवर आज होत असलेल्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे सकल मराठा समाजाने सांगितले आहे. या बैठकीत सर्व समाज बांधवांचे विचार ऐकून एक सर्व समावेशक धोरण ठरविण्यासाठी सर्व समाज बांधवांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Maratha community to take big decision before Lok Sabha code of conduct; An urgent meeting will be held in Solapur tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.