Maratha Reservation : भाजप सरकारचा ऐतिहासिक निर्णय : सहकारमंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 02:12 PM2018-11-29T14:12:30+5:302018-11-29T14:18:09+5:30

सोलापूर : सन २००० पासून प्रलंबित असलेले मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आज पूर्ण होत आहे. भाजपा सरकारने ऐतिहासिक ...

Maratha Reservation: The BJP Government's Historical Decision: Cooperation Minister, Subhash Deshmukh | Maratha Reservation : भाजप सरकारचा ऐतिहासिक निर्णय : सहकारमंत्री सुभाष देशमुख

Maratha Reservation : भाजप सरकारचा ऐतिहासिक निर्णय : सहकारमंत्री सुभाष देशमुख

googlenewsNext
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदभार्तील सरकारचा कृती अहवाल मांडलाधनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात सांगितले. 

सोलापूर : सन २००० पासून प्रलंबित असलेले मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आज पूर्ण होत आहे. भाजपा सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी याकरिता जे परिश्रम केले ते आज विठ्ठलाच्या कृपेने पूर्ण होत आहे.  विशेष म्हणजे ही मागणी पूर्ण होत असताना ओबीसीच्या आरक्षणाला तसूभरही धक्का न लावता हा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील ७०% समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल विधानसभेत गुरुवारी सादर करण्यात आला. त्यानंतर सहकारमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदभार्तील सरकारचा कृती अहवाल मांडला आहे. तसेच, याबाबतचे विधेयक पटलावर ठेवले आहे. कृती अहवालासोबत कायद्याची प्रतही देण्यात आली असून धनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात सांगितले. 

Web Title: Maratha Reservation: The BJP Government's Historical Decision: Cooperation Minister, Subhash Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.