मराठा आरक्षण ; बार्शीत बस जाळली, जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:02 PM2018-07-26T13:02:25+5:302018-07-26T13:05:05+5:30

गावागावात रास्ता रोको, जाळपोळ, निषेध मोर्चा काढण्यात येत आहे़

Maratha reservation; Bus burning in Barshi, 100% response to the closure of the district | मराठा आरक्षण ; बार्शीत बस जाळली, जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद

मराठा आरक्षण ; बार्शीत बस जाळली, जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद

Next
ठळक मुद्देमाढा येथे जागरण गोंधळ घालीत केला ठिय्या आंदोलनबार्शीत शाळकरी मुलीच्या हस्ते दिले निवेदन

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी गुरूवारी बार्शी बंदची हाक दिली होती़ याच वेळी बार्शी येथे करमाळा आगाराची बस पंढरपूरकडे जात असताना अज्ञात आंदोलनकर्त्यांनी बस पेटवून दिली़ 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून बार्शीसह संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन करण्यात येत आहे़ गावागावात रास्ता रोको, जाळपोळ, निषेध मोर्चा काढण्यात येत आहे़ याशिवाय जिल्ह्यातील बहुतांश गावांनी बंद पुकारला आहे़ व्यापारी, दुकानदार आदी वर्गांनी बंदमध्ये सहभाग नोंदवित सर्वच व्यवहार ठप्प ठेवले आहेत़ 

जिल्ह्यातील परिस्थितीबाबतचा आढावा़---------

  • - पानगांव येथे निषेध मोर्चा, सोलापूर-बार्शी महामार्ग रोखला
  • - नातेपुते ग्रामस्थांचा आक्रोश, दुकाने बंद ठेऊन शासनाचा केला निषेध
  • - बार्शीत शाळकरी मुलीच्या हस्ते दिले निवेदन
  • - करमाळा : गौंडरे येथे रास्ता रोको आंदोलन सुरू
  • - माढा येथे जागरण गोंधळ घालीत केला ठिय्या आंदोलन
  • - कुसळंब (ता़ बार्शी) येथे शिवाजी चौकात टायर पेटवून रास्ता रोको
  • - बार्शीत कडकडीत बंद, पेट्रोल पंप, मेडिकल, हॉस्पीटलसह १०० टक्के बंद
  • - बार्शीतील पांडे चौकात सामुदायिक मुंडन आंदोलन
  • - मोडनिंब येथे शिवसेनेचे माढा तालुका उपप्रमुख नितीन गडधरे यांनी दिला राजीनामा
  • - नान्नज (ता़ उ़ सोलापूर) येथे गाव बंद, व्यवहार ठप्प
  • - बोरामणी (ता़ द़ सोलापूर) येथे सोलापूर- हैद्राबाद महामार्ग रोखला

Web Title: Maratha reservation; Bus burning in Barshi, 100% response to the closure of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.