मराठा आरक्षणासाठी राजकारण नको न्यायालयीन लढा आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:23 AM2021-02-11T04:23:43+5:302021-02-11T04:23:43+5:30
कुर्डूवाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहात अ. भा. मराठा महासंघातर्फे आयोजित जिल्हास्तरीय मराठा आरक्षणाबाबत सद्यस्थिती, मार्गदर्शन व गुणवंत पुरस्कार वितरण ...
कुर्डूवाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहात अ. भा. मराठा महासंघातर्फे आयोजित जिल्हास्तरीय मराठा आरक्षणाबाबत सद्यस्थिती, मार्गदर्शन व गुणवंत पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, सरचिटणीस राजेंद्र कोंढारे, आमदार संजयमामा शिंदे, विलासराव घुमरे, अमोल भोसले, जिल्हाध्यक्ष संदीप भोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव, सिनेट सदस्य डॉ.सचिन गायकवाड उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत १३ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
राजेंद्र कोंढारे म्हणाले, मराठा आरक्षण कोर्टात टिकवायचे असेल तर राज्य शासनाने चांगल्यात चांगले विधीतज्ञ देऊन प्रयत्नशील रहावे, असे सांगितले.
कार्यक्रमसाठी तालुकाध्यक्ष धनाजी गोडसे, पं. स. सदस्य सुरेश बागल, शुभम दास, आनंद गोडगे, विकास म्हमाणे, विठ्ठल कदम, शिवराज गोडसे, अमोल गोडसे, साईनाथ गोडसे, जयंत भोरे, सुधीर सोमासे, माऊली पवार, संतोष ननवटे, सुरज भोसले, किरण व्यवहारे, वासू जाधव, प्रथमेश शिंदे, अजित चोपडे यांनी परिश्रम घेतले आहे.
फोटो
१०कुर्डूवाडी-सत्कार
कुर्डूवाडी येथे आयोजित मराठा महासंघाच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात समाजातील गुणवंतांच्या सत्काराप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार, आ. नरेंद्र पाटील, राजेंद्र कोंढारे, जिल्हाध्यक्ष संदीप भोरे.