मराठा आरक्षणप्रश्नी सोलापूर बंद; सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनाचा घेतलेला हा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:48 PM2020-09-21T12:48:14+5:302020-09-21T12:48:37+5:30
सोलापूर लोकमत विशेष...
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हा बंदचे आवाहन केले होते़ या बंदला विविध पक्षीय नेते, विविध समाजाच्या संघटना, व्यापारी संघटना यांनी पाठिंबा दिला होता़ त्यामुळे या बंदला सोलापूर शहर व जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला़ सोमवारी सकाळपासून मराठा समाजातील विविध कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर आसूड आंदोलन केले.
याशिवाय मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी नवीपेठेत सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले़ त्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाºयांनी पार्क चौकात केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पुतळा करून त्यावर आसूड ओढले़ यावेळी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या़ जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहासमोर आंदोलन केले.
--------------
जिल्ह्यातील आंदोलनावर एक नजऱ...
- - माढा येथील शिवाजी चौकात आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला़
- - पंढरपुरात मराठा समाज बांधवांनी केंद्र सरकारचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली़
- - कामती (ता़ मोहोळ) येथील मराठा आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़
- - कोंडी (ता़ उत्तर सोलापूर) येथे आंदोलनकर्त्यांनी सोलापूर-पुणे महामार्ग रोखला
- - सांगोल्यात सकल मराठा समाजाच्यावतीने मिरज रेल्वे गेटवर रस्ता रोको आंदोलन केले़
- - मोहोळ शहरातील मराठा समाजाने आंदोलन केले़
- - आंदोलनकर्त्यांनी पंढरपूर-फलटण-पुणे पालखी मार्गावर ठिय्या आंदोलन केले़
- - कुर्र्डूवाडीत परंडा चौकात मराठा आरक्षणासाठी दोन तास रस्ता रोको आंदोलन केले़
- - पिराची कुरोली (ता़ पंढरपूर) येथे कार्यकर्त्यांनी ठिय्या मारून आंदोलन केले़
- - अरण (ता़ माढा) येथे व्यापारी, बँक, ग्रामपंचायत कार्यालये बंद ठेवण्यात आली होती
- - कुर्डूवाडीसह परिसरातील गावात १०० टक्के बंद
- - अकलूज येथे समाज बांधवांनी चप्पल मारो आंदोलन केले़
- - पानगांव येथे समाज बांधवांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला़
- - खर्डी (ता़ पंढरपूर) येथे बंदला १०० टक्के प्रतिसाद
- - सांगोला येथील युवकाने रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सरकारचा निषेध केला