मराठा आरक्षण ; अक्कलकोट शहरात कडकडीत बंद, भव्य मोर्चाने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:51 PM2018-07-30T13:51:08+5:302018-07-30T13:53:19+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अक्कलकोट शहर मराठा क्रांती व सकल समाजाच्यावतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ .
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अक्कलकोट शहर मराठा क्रांती व सकल समाजाच्यावतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ सोमवारी अक्कलकोट शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला़ यावेळी काढण्यात आलेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले़ यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली़ या आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे हिंसक वळण लागू नये यासाठी अक्कलकोट शहर पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता
या मोर्चात अमोल भोसले, आ. सिध्दाराम म्हेत्रे, जि. प. कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, नगराध्यक्षा शोभा खेडगी, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, भाजपा तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, शहर भाजपा अध्यक्ष यशवंत धोंगडे, भाजपा पक्षनेते नगरसेवक महेश हिंडोळे, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, ग्रामदैवत मल्लिकार्जुन देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, अडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष स्वामीनाथ हिप्परगी, बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर मजगे, मुस्लीम समाज अध्यक्ष एजाज मुतवल्ली, अल्लीबाशा अत्तार, मैनोद्दीन कोरबू, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी, तालुका शिवसेनाप्रमुख मनोज पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप सिध्दे, रासपचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर आदी मान्यवर व मराठा बांधव सहभागी झाले होते
या मोर्चाला लहूजी शक्ती सेना, नाभिक समाज संघटना, संत गाडगेबाबा परीट समाजसेवा मंडळ, जैन समाज संघटनेचे अध्यक्ष अभय खोबरे, विवेकानंद प्रतिष्ठान, प्रहार जनशक्ती पक्ष, संत कक्कया युथ फाउंडेशन, जनसेवा संघटनेचे अध्यक्ष नितीन मोरे यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, माजी उपसभापती विलास गव्हाणे, प्रा. प्रकाश सुरवसे, मनोज इंगवले, मनोज निकम, मनोज गंगणे, आकाश गडकरी, योगेश पवार, आतिष पवार, वैभव नवले, शीतल जाधव, गोविंद शिंदे, स्वप्निल मोरे, सुरेश कदम, चेतन शिंदे, संजय गोंडाळ आदी मराठा समाजातील नेतेमंडळी उपस्थित होती.