नोकरी असल्याचे सांगून लग्न केले, तरुणांवर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:23 AM2021-01-03T04:23:32+5:302021-01-03T04:23:32+5:30
याबाबत अकलूज पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलीला व तिच्या आईवडिलांना एका तरुणाने शिक्षण बी.एस्सी.ॲग्री झाले आहे. पन्हाळा, जि.कोल्हापूर ...
याबाबत अकलूज पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलीला व तिच्या आईवडिलांना एका तरुणाने शिक्षण बी.एस्सी.ॲग्री झाले आहे. पन्हाळा, जि.कोल्हापूर येथे मंडलकृषी अधिकारी या पदावर नोकरीत आहे. सरकारने वापरण्यासाठी गाडी दिली आहे. चार एकर जमीन, जे.सी.बी. मशीन, दोन ट्रक, कराड, बारामती येथे प्लॉट असल्याचे खोटे सांगून तक्रारदार व तिच्या घरच्यांची फसवणूक केली. तसेच मंडल कृषी अधिकारी असल्याबाबत बनावट कागदपत्रे तयार करून व खोटे सोने घालत १४ ऑगस्ट रोजी २०२० रोजी लग्न केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे महेश जगदाळे या तरुणावर गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली. माळशिरस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कुंभार करीत आहेत.