विवाहितेवर कुऱ्हाडीने वार

By Admin | Published: June 22, 2014 11:08 PM2014-06-22T23:08:25+5:302014-06-23T00:25:12+5:30

तुळजापूर : विवाहितेच्या पायावर कुऱ्हाडीने वार करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Married to the wedding | विवाहितेवर कुऱ्हाडीने वार

विवाहितेवर कुऱ्हाडीने वार

googlenewsNext

तुळजापूर : घरात ठेवलेल्या एक ग्रॅम सोन्याचे काय केले याची विचारणा करणाऱ्या विवाहितेच्या पायावर कुऱ्हाडीने वार करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मंगळवारी तुळजापूर खुर्द येथे घडली़
पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर खुर्द येथील जगन्नाथ नामदेव म्हेत्रे यांचा मुलगा महेश याच्याशी काक्रंबा (ता़तुळजापूर) येथील बलभीम माळी यांची मुलगी उर्मिला यांचा एक वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात विवाह झाला आहे़ लग्नानंतर उर्मिला हिस पतीसह सासू-सासरच्यांनी काम येत नाही, नीट वागत नाहीस असे म्हणत शारीरिक, मानसिक जाच केला़ तर मंगळवारी उर्मिला हिने पती महेश यास घरात ठेवलेले एक ग्रॅम सोन्याचे काय केले असे विचारले होते़ तिने सोन्याबाबत विचारल्यानंतर संतापलेल्या महेश याने रागाच्या भरात तू सोने कुठून आणलेस असे म्हणत भांडण केले़ तसेच रात्री नऊच्या सुमारास झोपेत असलेल्या उर्मिला हिच्या पायावर कुऱ्हाडीने जबर मारहाण केली़ तर सासू, सासऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विवाहितेवर तुळजापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ जखमी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती महेश म्हेत्रे, सासरा जगन्नाथ म्हेत्रे व सासू वनिता म्हेत्रे यांच्याविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेनंतर पतीसह सासू-सासरे फरार असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ राजाभाऊ सातपुते हे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Married to the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.