मंगळवेढा: भीतीतून दिलासादायक वाटचाल लसीकरणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:20 AM2021-01-17T04:20:18+5:302021-01-17T04:20:18+5:30

यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ...

Mars: Coming out of fear, start vaccination | मंगळवेढा: भीतीतून दिलासादायक वाटचाल लसीकरणाला प्रारंभ

मंगळवेढा: भीतीतून दिलासादायक वाटचाल लसीकरणाला प्रारंभ

Next

यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्माकर आहिरे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ. सुमित्रा तांबारे, समन्वयक शोभा माने, आयएमए अध्यक्ष डॉ. मधुकर कुंभारे,निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील जाधव उपस्थित होते.

प्रारंभी लसीकरण प्रतीक्षा कक्ष तपासणी, लस देणे, ऑनलाईन नोंदणी करणे, लस देऊन त्यांना दिलेल्या क्रमांकावर अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवणे, अचानक कोणता त्रास होत असेल तर वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात येऊन त्यासाठी ऍम्ब्युलन्स सेवा तयार ठेवण्यात आली होती. यावेळी लस घेतलेल्या अनेक जणांना कोणताही त्रास जाणवल्याचे दिसले नाही.

कोट ::::::::::::::::::::

मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः आशा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

- डॉ. नंदकुमार शिंदे

तालुका आरोग्य अधिकारी

फोटो ओळी :::::::::::::::::::

ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे कोविशिल्ड लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे आदी.

Web Title: Mars: Coming out of fear, start vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.