ढोलकीचा थाप मारणाऱ्या विनोदने पत्करलं गवंडीकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:23 AM2021-04-23T04:23:41+5:302021-04-23T04:23:41+5:30

मोडनिंब : कोरोनाने गर्दीची ठिकाणे बंद केली. गतवर्षी बंद झालेली सर्व कला केंद्रं पुन्हा नव्या जोमात सुरू झाली ...

The masonry work was done with the beating of a drum | ढोलकीचा थाप मारणाऱ्या विनोदने पत्करलं गवंडीकाम

ढोलकीचा थाप मारणाऱ्या विनोदने पत्करलं गवंडीकाम

Next

मोडनिंब

: कोरोनाने गर्दीची ठिकाणे बंद केली. गतवर्षी बंद झालेली सर्व कला केंद्रं पुन्हा नव्या जोमात सुरू झाली होती. मात्र चार ते पाच महिन्यातच कोरोनाने

पुन्हा डोके वर काढले. त्यामुळे सर्व कलाकेंद्रं पुन्हा बंद झाली. उपासमारीच वाटेला आल्यानंतर स्वत:ला बदलून घेत गवंडी कामाची वाट एका ढोलकी वादकाने चोखाळली आहे. मात्र लॉकडाऊनने पुन्हा संघर्ष गडद केला.संघर्ष अनुभवतोय टेंभुर्णीच्या कलाकेंद्रातील एक तरुण.

मात्र त्याच्यात बहूविध कला दडल्या आहेत. त्याने ढोलकी वाजवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्याने ढोलकीच्या कडकडाटावर अकलूजच्या

राज्यस्तरीय लावणी नृत्यस्पर्धेत अनेकदा सहभाग नोंदवत कला अदाकारी केली.

विनोद घुमरे (इचलकरंजी) असे त्याचे नाव असून मोडनिंब येथील राधिका

लोकनाट्य कला केंद्रात २५ वर्षापासून ढोलकी वादक म्हणून काम करतोय. नामवंत नृत्यांगना असली तरी ढोलकीच्या तालाशिवाय घुंगराचे बोल बोलू शकत

नाहीत.मात्र कोरोनामुळे ढोलकीची थाप थांबली. मोडनिंब परिसरात काही ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्या ठिकाणी तो आता गवंडी काम करत आहे.---

उपजत

कला मरूही देत नाही आणि त्या अंगातून संपतही नाहीत. या कला बऱ्याचदा अर्थार्जनाचे साधन ठरतात. कलेचा छंद जोपासत त्यातला आनंद घेत अर्थार्जन

केले. आता लॉकडाऊनमुळे बांधकामाला वाळू मिळत नाही. आठवड्यातून एक-दोन दिवस

काम मिळते. तेवढ्यावरच गुजराण सुरु आहे. - विनोद घुमरे

---...अन त्याने गवंडीकाम पत्करले

यंदाही

लॉकडाऊनमुळे कला केंद्रं बंद झाली. मुलाबाळांचा उदरनिर्वाह करायचा कसा?

राहायला घर नाही ना कसायला जमीन. गरिबीमुळे हा कलाकार लहानपणी शाळेत जाऊ

शकला नाही. कोल्हापूर येथील चुलते शंकर लाखे हे गवंडी काम करतात.

आईवडिलांना मदत करण्यासाठी तो त्यांच्या हाताखाली काम करतो. ----

फोटाे : २१ मोडनिंब १ आणि २ ढोलकीचा कडकडाट करत कला सादर करणारा विनोद सध्या लॉकडाऊनमुळे गवंडी काम करतोय

Web Title: The masonry work was done with the beating of a drum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.