अन्याय व अत्याचाराच्या विरोधात सोलापूरात मातंग समाजाचा निषेध मुकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 02:18 PM2018-07-04T14:18:12+5:302018-07-04T14:19:55+5:30
सोलापूर : गाव गाड्यात रूजलेला मातंग समाज प्रामाणिक व कष्टाळू आहे़ याचा गैरफायदा घेऊन जातीयवादी मनोविकृतांनी केलेल्या अन्याय अत्याचाराचा जाब विचारण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील मातंग समाजाच्यावतीने निषेध मुकमोर्चा काढण्यात आला़
या मोर्चाची सुरूवातील भैय्या चौकातील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सुरूवात झाली़ जिल्हाधिकारी कार्यालय या मोर्चाचा समारोप झाला़ या मोर्चात राज्यातील मातंग समाजावर अन्याय व अत्याचार करणाºया समाजकंठकावर कारवाई व्हावी, आण्णाभाऊ साठे महामंडळातील प्रकरणे त्वरीत मंजूर करावीत, महामंडळातील थकीत कर्र्जे माफ करावीत, मातंग समाजाला जमिनी उपलब्ध करून द्यावेत, शासनाने गोठविलेले मांग वतन व रामोशी वतन पुन्हा सुरू करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले़
यावेळी माजी मंत्री प्रा़ लक्ष्मणराव ढोबळे, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, सुहास शिंदे, सुरेश पाटोळे, गोविंद कांबळे, रोहित खिलारे, समाधान आवळे, उमेश काळे, उमेश मस्के, महेश पवार, भैरू आबा लोंढे, शांतीलाल साबळे आदी मातंग समाजातील मान्यवर व विविध संघटना, संघटनाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते़