सांगवीतील धाडीत वाळूसह २३ लाखांचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:05+5:302021-06-03T04:17:05+5:30
करमाळा : सांगवी (नं १, ता.करमाळा) येथे भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी यावर ...
करमाळा : सांगवी (नं १, ता.करमाळा) येथे भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी यावर धाड टाकून एक ब्रास वाळूसह २३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १ जूनच्या पहाटे २ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, सांगवी येथे भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना मिळाली होती. अपर अधीक्षक अतुल झेंडे, करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली व करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जेऊर दूर क्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल आनंद पवार, घुगे, कांबळे, पोलीस नाईक मराळे यांनी या कारवाईत सहभाग नोंदविला. या कारवाईत जेसीबी, ट्रॅक्टर व दोन चाकी डम्पिंग टेलर असा २३ लाख ३० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी संभाजी उत्तम सरडे (रा. कवीटगाव, ता.करमाळा), राजेंद्र मल्हारी ठोंबरे (रा.पांगरे, ता.करमाळा), संदीप मच्छिंद्र खाडे (रा.शेलगाव, ता.करमाळा) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस नाईक गणेश शिंदे करत आहे.