महापुरामुळं गणेशोत्सवाची गणितं बदलली; सोलापूरच्या मूर्ती यंदा सांगली-कोल्हापुरात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 02:34 PM2019-08-21T14:34:29+5:302019-08-21T14:35:36+5:30
गणेशमुर्तींना परराज्यातून मागणी वाढली : आंध्रप्रदेश-कर्नाटकातही मूर्ती जाणार
सोलापूर : राज्यात सर्वांत मोठा सार्वजनिक उत्सव म्हणून गणेशोत्सवाची ओळख आहे. हा उत्सवही मोठ्या प्रमाणात राज्यासह देशभरातही साजरा केला जातो पण यंदा कोल्हापूर, सांगली, पंढरपूर आदी भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थितीमुळे या भागात गणपती मूर्ती हे कमी प्रमाणात बनवले आहेत. यामुळे शेजारील शहर, जिल्ह्यातून यंदा गणपती आणून विक्री केल्याशिवाय व्यापाºयांना पर्याय नाही़ यामुळे येथील व्यापारी सोलापुरात येऊन मूर्ती घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे यंदा सांगली-कोल्हापूरभागात सोलापूरचे बाप्पा विराजमान होण्यासाठी जात आहेत.
सोलापुरात एकू ण लहान-मोठे असे जवळपास दोनशेच्या पुढे मूर्तिकार आहेत. यातील ५० मूर्तिकार हे प्रत्येक वर्षी दहा ते वीस हजारांदरम्यान मूर्ती बनवत असतात़ हे मूर्तिकार सहा महिन्यांपासूनच याची तयार करत असतात.
इतर सर्व मूर्तिकारांकडून जवळपास पाच लाखांच्या पुढे लहान-मोठ्या आकाराच्या मूर्ती बनवल्या जातात़ याचबरोबर औरंगाबाद, पेण, गणपतीपुळे आदी भागातूनही मूर्ती आणल्या जातात़ या भागातील मूर्तींना जास्त दरही मिळतात, असे व्यापाºयांचे मत आहे.
सोलापुरातील जवळपास ५० ते ६० टक्के मूर्ती या आंध्रप्रदेश, हैदराबाद, कर्नाटक या भागात विक्रीस जातात़ तर उर्वरित मूर्ती या शहर-जिल्ह्यात विकल्या जातात़ काही वेळेस सोलापूरच्या बाजारात हजारो गणपती शिल्लक राहत असतात़ यंदा सोलापूर शहरात मूर्ती शिल्लक राहण्याची शक्यता कमी आहे, असे मूर्तीकार आणि व्यापाºयांकडून बोलले जात आहे.
लहान मूर्र्तींना मागणी
- काही दिवसांपासून सांगली-कोल्हापूरची स्थिती सामान्य होत आहे़ यामुळे येथील व्यापारी मूर्ती घेण्यासाठी सोलापूरला येत आहेत़ सध्या पूरजन्य भागातून पाच फुटाच्या आतील गणपतीची मागणी वाढत आहे़ मोठ्या गणपतींपेक्षा लहान म्हणजे पाच फुटातील गणपतींची आॅर्डर दिली जात आहे़ तेथील काही व्यापाºयांच्या मतानुसार यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा अनेक मंडळांचा विचार आहे़ यामुळे मोठमोठ्या मूर्ती न घेता मंडळासाठी पाच फुटांपर्यंत घेण्यात येत आहे, अशी माहिती मोठ्या मूर्ती बनविणारे मूर्तिकार रामुस्वामी चिन्नी यांनी दिली.
गेल्या वीस वर्षांपासून मी मूर्ती बनवतो़ प्रत्येक वर्षी मूर्तींची मागणी वाढत असते़ या मूर्ती हैदराबाद, कर्नाटक येथे जात असतात़ हैदराबादमध्ये सोलापूरच्या मूर्तींची मागणी जास्त आहे़ सोलापुरात जवळपास पाच लाख मूर्ती बनवल्या जातात़ यातील साठ टक्के मूर्ती परराज्यात पाठविल्या जातात
-भास्कर तुम्मा
मूर्तिकार
आम्ही प्रत्येक वर्षी जवळपास दहा हजार लहान मूर्ती बनवत असतो़ यातील बहुतांश गणपती हे आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये जात असतात़ पण यंदा सांगली-कोल्हापूरमध्ये मूर्तींचा तुटवडा असल्यामुळे तेथील काही प्रमाणात व्यापाºयांनी मूर्ती बुक केल्या आहेत, पण पुढील काळात मागणी वाढेल अशी चिन्हे आहेत़ प्रत्येक वर्षी बाजारात अधिक मूर्ती असतात़.
-अनिल बडगू, मूर्तिकार