माउलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश, आकर्षक फुलांची सजावट

By दिपक दुपारगुडे | Published: June 23, 2023 05:40 PM2023-06-23T17:40:01+5:302023-06-23T17:40:19+5:30

माळशिरस तालुक्यातील धर्मपुरीत स्वागत

Mauli's palanquin enters Solapur district, | माउलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश, आकर्षक फुलांची सजावट

माउलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश, आकर्षक फुलांची सजावट

googlenewsNext

सोलापूर  : माउली माउलीचा जय घोष करत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा शुक्रवारी (दि. २३) सकाळी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे प्रवेश झाला.बरड (ता. फलटण) येथून संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी नातेपुते मुक्कामासाठी निघाली. ध पुरीहून पुढे कारुंडे बंगला याठिकाणी दुपारच्या विसाव्यासाठी थांबून नातेपुते येथे मुक्कामासाठी पालखी निघाली.

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, परभणीचे खा. संजय जाधव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते.

शंभरकर यांनी स्वीकारली सोहळ्याची सूत्रे

सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पालखी सोहळ्याची सूत्रे सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सोपविली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सकाळी बरड (ता. फलटण) येथून धर्मपुरी (ता. माळशिरस) सरहद्दीवर १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचला. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर दुपारच्या विसाव्यासाठी पालखी सोहळा कारुंडे (ता. माळशिरस) येथे ११ वाजून ३८ मिनिटांनी पोहोचला.

Web Title: Mauli's palanquin enters Solapur district,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.