सोलापुरात ३५ केंद्रांवर झालेल्या एमपीएससी परीक्षेत अडीच हजारांवर परीक्षार्र्थींची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 02:15 PM2019-02-18T14:15:14+5:302019-02-18T14:23:11+5:30
सोलापूर : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा रविवारी सोलापुरातील ३५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेला पहिल्या ...
सोलापूर : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा रविवारी सोलापुरातील ३५ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेला पहिल्या पेपरला तब्बल २ हजार ८२१ परीक्षार्थींनी दांडी मारली. दुपारच्या सत्रात घेण्यात आलेल्या दुसºया पेपरसाठीही २ हजार ८७७ परीक्षार्थींनी दांडी मारली.
लोकसेवा आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेकरिता एकूण १२ हजार ७५३ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी ९ हजार ९३२ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. दुपारच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी ९ हजार ८७६ जणांनी हजेरी दर्शवून परीक्षा दिली.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी १ हजार १३५ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते. परीक्षा काळात गैरप्रकार होऊ नये याची विशेष दक्षता घेण्यात आली होती. त्यामुळे परीक्षेदरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती परीक्षा नियंत्रक तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदींसारख्या पदांवर काम करण्याची उमेद बाळगून बहुतांश पदवीधारक राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात. मात्र ही परीक्षा अत्यंत आव्हानात्मक असते. स्पर्धा परीक्षेकरिता पूर्वतयारी असणे आवश्यक असते. परीक्षेसाठी नोंदणी केली होती, मात्र पूर्वतयारी न झाल्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेस हजर नसल्याची माहिती विद्यार्थ्यांतून देण्यात आली.