सोलापूरातील एमडी ड्रग्ज कारखाना नाशिक पोलिसांकडून उध्वस्त; कोट्यवधींचा कच्चा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 08:58 AM2023-10-28T08:58:40+5:302023-10-28T09:16:25+5:30

सोलापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

MD drugs factory in Solapur destroyed by Nashik police; Raw materials worth crores seized | सोलापूरातील एमडी ड्रग्ज कारखाना नाशिक पोलिसांकडून उध्वस्त; कोट्यवधींचा कच्चा माल जप्त

सोलापूरातील एमडी ड्रग्ज कारखाना नाशिक पोलिसांकडून उध्वस्त; कोट्यवधींचा कच्चा माल जप्त

सोलापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एमडी ड्रग्ज रॅकेट प्रकरणी आता नाशिक पोलीस अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. सोलापूरातील एमडी ड्रग्ज कारखाना नाशिक पोलिसांनी उध्वस्त केला आहे, कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि कच्चा मालही सापडपला आहे. सोलापूरातील काही संशयीतांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. 

सोलापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एमडी ड्रग्ज रॅकेट प्रकरणी आता नाशिक पोलीस अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. सोलापूरातील एमडी ड्रग्ज कारखाना नाशिक पोलिसांनी उध्वस्त केला आहे, कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि कच्चा मालही सापडपला आहे. सोलापूरातील काही संशयीतांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. 

नाशिकमधून मोठं ड्रग्ज रॅकेटचे प्रकरण समोर आल्यानंतर आता पोलिसांनी राज्यभरात छापे टाकण्यास सुरूवात केली आहे. आरोपी ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेऊन आता चौकशी सुरू केली आहे. 

ड्रग्ज माफिया ललित पाटील याने २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पळ काढला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला पळवण्यात आले. मात्र, असे असताना पोलिसांचा हलदर्जीपणा हे देखील यातील एक मुख्य कारण होते. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी याप्रकरणी अजून एका महिला अधिकाऱ्याला कर्तव्यात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्याचे आदेश काढले. सहायक पोलिस निरीक्षक सविता हनुमंत भागवत असे या निलंबित महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. याआधी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एका महिला पोलिस उपनिरीक्षकासह नऊ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते.

सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या सविता भागवत यांची नेमणूक मुख्यालयाच्या कोर्ट कंपनी युनिटमध्ये होती. त्यांना ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयात असलेल्या कैदी वॉर्ड क्रमांक १६ येथे दिवसपाळीसाठी देखरेख अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपचारासाठी दाखल असलेल्या कैद्यांची कसून झडती घेणे गरजेचे होते. मात्र, भागवत यांनी तसे केल्याचे दिसून आले आले नाही, कारण त्याच दिवशी ललितकडे २ मोबाइल आढळले. तसेच भागवत यांनी कर्तव्यावर पूर्णवेळ थांबणे गरजेचे असताना त्या दुपारी दीडच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या कैदी वॉर्डमधून रवाना झाल्याची नोंद रजिस्टरमध्ये घेण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ९ अशी त्यांना ड्युटी लावलेली असताना केवळ अर्ध्यासाठी तासासाठी त्या ससूनमध्ये गेल्याचे देखील स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Web Title: MD drugs factory in Solapur destroyed by Nashik police; Raw materials worth crores seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.