दीपोत्सवस्थळी ‘अश्विनी’कडून वैद्यकीय सेवा; गवळी समाज महिलांचीही स्वयंसेवकांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 10:47 AM2020-01-09T10:47:31+5:302020-01-09T10:49:04+5:30
सोलापूर सिध्देश्वर यात्रा; उजळवू या मंदिर परिसर : मेणबत्त्या देण्याबरोबर ‘अक्कनबळग’च्या २५ महिलांचे योगदानही
सोलापूर : ‘लोकमत’ची संकल्पना आणि अन्य सात सेवाभावी संस्थांच्या पुढाकारातून १० ते १२ जानेवारीपर्यंत मंदिर परिसरात होणाºया दीपोत्सवासाठी अश्विनी सहकारी रुग्णालयाचे एक पथक सज्ज ठेवणार असून, हे पथक तातडीची वैद्यकीय सेवा देणार असल्याचे चेअरमन बिपीनभाई पटेल यांनी सांगितले. गवळी समाजातील ५० महिला स्वयंसेवकांची भूमिका बजावणार आहेत तर अक्कनबळग महिला मंडळाने मेणबत्त्या देऊन दीपोत्सवात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
तीन दिवस चालणाºया लक्ष दीपोत्सवात सहभागी होणाºया भक्तगणांचा विचार करून रुग्णसेवा करून श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी सेवा बजावण्याची संधी यंदा मिळत असल्याचे बिपीनभाई पटेल यांनी सांगितले. ‘रुग्णसेवा हीच ईशसेवा’ करण्याचे भाग्य लाभणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गेल्या रविवारी श्री वीरशैव वैदिक मंडळाच्या शिव-पार्वती विवाह सोहळ्यातही विविध मठांच्या मठाधिपतीसह ‘लोकमत’च्या दीपोत्सवात भक्तगणांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
दीपोत्सव यशस्वी करुच- उज्ज्वला पंगुडवाले
- खºया अर्थाने महिलांच्या सहभागाशिवाय दीपोत्सव यशस्वी होऊ शकत नाही. या दीपोत्सवाला महिलांचे हात लागले तर मंदिर अन् तलाव परिसर उजळून निघणार आहे. पणत्यांमध्ये तेल ओतण्यापासून ते दिवे लावण्यापर्यंतचे पुण्य काम करण्यासाठी गवळी समाजातील ५० महिला स्वयंसेविकांची भूमिका बजावणार असल्याचे उपाध्यक्षा उज्ज्वला पंगुडवाले यांनी सांगितले. दीपोत्सवात अध्यक्षा मनीषा हुच्चे, सचिवा सपना दहिहंडे, सहसचिवा कल्पना बडवणे, कोषाध्यक्षा शैला जानगवळी, सदस्या अनुसया शहापूरकर, सरस्वती लकडे, कीर्ती बहिरवाडे, श्वेता त्रिकप्पा, कविता बहिरवाडे आदी सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत.
दीपोत्सवासाठी लागणाºया काही मेणबत्त्या अक्कनबळग महिला मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहेत. याशिवाय दीपोत्सव नेटका अन् देखणा करण्यासाठी मंडळाच्या २५ सदस्या स्वयंसेविका म्हणून योगदान देणार आहेत.
-सुरेखा बावी, अध्यक्षा- अक्कनबळग महिला मंडळ.
दीपोत्सवात विविध जाती-धर्मातील लोक योगदान देत आहेत. आपणही समाजाचे एक देणे म्हणून या दीपोत्सवासाठी २५ किलो तेल देणार आहे. सोलापूरच्या ब्रँडिंगसाठी ‘लोकमत’च्या या दीपोत्सवात व्यापाºयांनी सहभाग नोंदवावा.
-गौरीशंकर जेटगी, व्यापारी, मार्केट यार्ड.
सोलापूरचे ब्रँडिंग व्हावे यासाठी ‘लोकमत’ची चळवळ सुरू आहे. या चळवळीस गती मिळावी म्हणून दीपोत्सवात सहभागी होताना तीन दिवस मंदिर परिसरात अश्विनी सहकारी रुग्णालयाचे एक पथक राहणार आहे. तातडीची वैद्यकीय सेवा बजावण्याचे काम हे पथक करणार आहे.
-बिपीनभाई पटेल,
चेअरमन - अश्विनी सहकारी रुग्णालय.