ग्लोबल व्हिलेज ग्रामीण रुग्णालयास वैद्यकीय उपकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:15 AM2021-06-22T04:15:54+5:302021-06-22T04:15:54+5:30

सोलापूर : कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बोरामणी येथील ग्लोबल व्हिलेज ग्रामीण रुग्णालयास ...

Medical equipment for Global Village Rural Hospital | ग्लोबल व्हिलेज ग्रामीण रुग्णालयास वैद्यकीय उपकरणे

ग्लोबल व्हिलेज ग्रामीण रुग्णालयास वैद्यकीय उपकरणे

Next

सोलापूर : कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बोरामणी येथील ग्लोबल व्हिलेज ग्रामीण रुग्णालयास थेट अमेरिकेहून सेवा इंटरनॅशनल या संस्थेमार्फत वैद्यकीय उपकरणे भेट देण्यात आली.

कोरोनाकाळात याच ग्लोबल व्हिलेज ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या मार्फत अनेक रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देत असतानाच अमेरिकेहून थेट ग्लोबल व्हिलेज ग्रामीण रुग्णालयापर्यंत सेवा इंटरनॅशनल या संस्थेने ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, २ बायप्यप मशीन, पल्स ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड थरमोमीटर, फेस मास्क, पीपीई किट व ३० अद्ययावत हॉस्पिटल बेड आदी साहित्य पोहोचविण्याचे काम केले.

या उपकरणांचा लोकार्पण सोहळा सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव व माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश दुधनी यांच्या हस्ते झाला. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, बोरामणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इरन्ना राठोड उपस्थित हाेते.

सेवा इंटरनॅशनल, अमेरिकेच्या वतीने या वस्तू ग्लोबल व्हिलेजपर्यंत पोहोचविण्यासाठी मूळचे अक्कलकोटचे पण सध्या अटलांटा, अमेरिका येथे स्थायिक असलेले डॉ. अजय हौदे यांनी तर भारतातून हैदराबादचे सेवा कार्यकर्ते आर. के. अनिल, केरळचे डॉ. डी. सरवण, दिल्ली येथील दीपक सिंग, विजय मिश्रा, प्राचार्य विनील जांभळे, प्राचार्या अस्मा नदाफ, मल्लिनाथ जळकोटे, डॉ. पूजा जाधव, अप्पासाहेब घुगले, अविनाश राठोड, रंजना दुपारगुडे, इंदूबाई सुतार यांचे सहकार्य लाभले

.---

फोटो : २० ग्लोबल

बोरामणी ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनसह विविध वस्तू देताना डॉ.प्रकाश दुधनी, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, वैद्यकीय अधिकारी डॉ. इरन्ना राठोड.

Web Title: Medical equipment for Global Village Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.