मेडिकलधारकांनो सावधान..प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिल्यास परवाना होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 03:27 PM2021-02-23T15:27:00+5:302021-02-23T15:27:07+5:30

औषध विभाग सतर्क : वर्षभरात बारा मेडिकलचे झाले परवाना रद्द

Medical holders beware .. if medicines are given without a prescription, the license will be revoked | मेडिकलधारकांनो सावधान..प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिल्यास परवाना होणार रद्द

मेडिकलधारकांनो सावधान..प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिल्यास परवाना होणार रद्द

Next

सोलापूर : सर्दी, ताप, डोकेदुखी तसेच इतर आजारांवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणाऱ्या मेडिकलवर आता औषध विभागाची कडक नजर राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. वर्षभरात प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणार्‍या १२ मेडिकलचे परवाना रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती औषध निरीक्षक तथा औषध विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त नामदेव भालेराव यांनी ‘लोकमत’ला दिली.

वर्षभरापासून कोरोनाचा संकट आहे. सर्दी, ताप खोकला आणि डोकेदुखी सारखी लक्षणे दिसू लागल्यानंतर रुग्ण डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकलकडे धाव घेतात. औषध देण्याची मागणी करत आहेत. रुग्णांच्या मागणीनुसार मेडिकल दुकानदारही औषधे देतात. औषधांचा हा पुरवठा बेकायदा असून, याचा विपरीत परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होऊ शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते कोरोना टेस्ट करून घ्या, असे सांगतात. डॉक्टरांच्या या सकारात्मक सल्ल्याची भीती रुग्णांच्या मनात आहे. त्यामुळे रुग्ण डॉक्टरांकडे न जाता मेडिकल कडून औषधे घेत आहेत. ही बाब चुकीची आहे. कोरोनाला प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने आता सर्व मेडिकलचालकांना याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रुग्णांची संख्या दररोज कळवा !

मेडिकलचालकांनी रुग्णांना प्रिस्क्रिप्शन बंधनकारक करावे. तसा फलक दर्शनी भागात लावावा. तसेच मास्क न घातलेल्या रुग्णांना मेडिकलमध्ये प्रवेश देऊ नये, असे भालेराव यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची आकडेवारी रोजच्या रोज प्रशासनाला कळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

Web Title: Medical holders beware .. if medicines are given without a prescription, the license will be revoked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.