झाडाझडतीत औरादच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:26 AM2021-08-19T04:26:32+5:302021-08-19T04:26:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रंजना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रंजना कांबळे यांनी अचानक दिलेल्या भेटीत औराद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन कर्मचारी जागेवर नसल्याचे दिसून आले. याबाबतचा अहवाल त्यांनी तातडीने सीईओंकडे सादर केला आहे.
सीईओ दिलीप स्वामी यांनी एकाच वेळी जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रंजना कांबळे यांनी औराद प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलम घोगरे, फार्मासिस्ट पी. बी. सोळंकी, आरोग्य सहायक एम. बी. देशमुख हे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नव्हते. इतर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्याविषयी ठोस माहिती देण्यात आली नाही.
-----
हालचाल रजिस्टरवर नोंद नाही
औराद प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरहजर कर्मचाऱ्यांपैकी डॉ. नीलम घोगरे या तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांच्या बैठकीला उपस्थित होत्या, तर अन्य दोघे बाहेर आरोग्य सेवेत व्यस्त असल्याची माहिती चौकशीत निष्पन्न झाली. मात्र, याबाबतच्या नोंदी त्यांनी हालचाल रजिस्टरमध्ये केल्या नव्हत्या. त्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे रंजना कांबळे यांनी सीईओ यांना सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.
---