रेमडेसिवीर इंजेक्शन चार हजारांना विकणारे मेडिकल सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:32+5:302021-04-09T04:23:32+5:30
राजन ठक्कर यांनी आपल्या दुकानातील व्यक्तीला रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्यासाठी येथील मेडिकल दुकानात पाठवले होते. तेव्हा सुरुवातीला त्यांना नाही, असे ...
राजन ठक्कर यांनी आपल्या दुकानातील व्यक्तीला रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्यासाठी येथील मेडिकल दुकानात पाठवले होते. तेव्हा सुरुवातीला त्यांना नाही, असे सांगण्यात आले. मात्र, पुन्हा ४ हजार रुपयांना इंजेक्शन मिळेल, असे सांगितले. विशेष म्हणजे कुठल्याही डॉक्टरची चिठ्ठी नसून साध्या कागदावर ही इंजेक्शनची मागणी होती. तरीही, येथील मेडिकल दुकानदाराने ४ हजार रुपये घेऊन हे इंजेक्शन ब्लॅकने दिले आहे. विशेष म्हणजे शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार १५०० ते १७०० रुपयांपेक्षा जास्त दराने हे इंजेक्शन विकता येत नाही, असे राजन ठक्कर यांनी म्हटले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही त्यांनी बनवला आहे.
गुरुवारी सकाळी तहसीलदार सुनील शेरखाने, अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक नामदेव भालेराव, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी भेट देऊन पाहणी केली व वरील कारवाई केली.
मागणी जास्त, पुरवठा कमी
सध्या कोरोना रुग्णांत एचआरसीटी स्कोअर ही १० पेक्षा जास्त निघण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी वाढली.
बुधवारी दिवसभर तुटवडा होता. रात्री बार्शीत ३०० ते ३५० इंजेक्शन आली आहेत. ही एकाच दिवसात संपण्याची शक्यता आहे. बार्शीत आठ तालुक्यांतील रुग्ण उपचार घेत आहेत. कोविड उपचार करणारी हॉस्पिटल्स येथे जास्त आहेत. याचा विचार करून या इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी मागणी बार्शी केमिस्ट असो.ने प्रांताधिकारी हेमंत निकम आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे केल्याचे अध्यक्ष सुधीर राऊत यांनी सांगितले.
१० टक्के नफ्याने विक्री करण्याचे आदेश
शासनाने या औषधांची मागणी वाढल्याने मेडिकल दुकानदारांना ज्या दरात हे इंजेक्शन आले आहे किंवा येत आहे. त्यावर सामाजिक बांधिलकी म्हणून केवळ १० टक्के नफा घेऊन त्याची विक्री करावी, असा जीआर आहे. असे असतानाही काही दुकानदार अद्याप ह्या इंजेक्शनवर असणाऱ्या एमआरपीप्रमाणे विक्री करून लूट करत आहेत. साधारणपणे होलसेल विक्रेत्यांकडून रिटेलरला हे इंजेक्शन १०८० रुपयांना विक्री केले जाते. त्यावर १० टक्के म्हणजे ११८८ रुपयांना विक्री केली पाहिजे; पण तसे होताना दिसत नाही.