लाचप्रकरणी वैद्यकीय अधीक्षकास कोठडी, मात्र अंतरिम जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:43 AM2021-02-05T06:43:15+5:302021-02-05T06:43:15+5:30
डॉ. संतोष आडगळे यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ या पदाचा दुरुपयोग करून तक्रारदार यांच्या गर्भवती पत्नीच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी ९ हजार ...
डॉ. संतोष आडगळे यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ या पदाचा दुरुपयोग करून तक्रारदार यांच्या गर्भवती पत्नीच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी ९ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. विशेष पथकाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. शनिवारी बार्शी न्यायालयात उभे केल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर त्यांनी याप्रकरणी कोविड-१९ अंतरिम जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. मात्र, सरकार पक्षाच्या वतीने ॲड. प्रदीप बोचरे यांनी युक्तिवादात यातील आरोपी हा क्लास वन अधिकारी असून, तक्रारदार हा रिक्षाचालक असल्याने त्याच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. शिवाय त्याचा तपास चालू असल्यामुळे अंतरिम जामीन नामंजूर करण्यात यावा, असे म्हटले. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून अंतरिम जामीन फेटाळला.