मोडनिंबच्या सरपंचपदी मीना शिंदे; उपसरपंच दत्तात्रय सुर्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:23 AM2021-02-24T04:23:57+5:302021-02-24T04:23:57+5:30
मोडनिंब येथील मोडनिंब शहर विकास आघाडीच्या ११ जागा निवडून आल्या होत्या; तर विरोधी पक्षाच्या दोन जागा स्वाभिमानी विकास आघाडीस, ...
मोडनिंब येथील मोडनिंब शहर विकास आघाडीच्या ११ जागा निवडून आल्या होत्या; तर विरोधी पक्षाच्या दोन जागा स्वाभिमानी विकास आघाडीस, तसेच लोकशाही आघाडीच्या तीन जागा निवडून आल्या होत्या. एक अपक्ष उमेदवार सीता सावंत निवडून आल्या होत्या. मोडनिंब शहर विकास आघाडीच्या पॅनलला १७ पैकी ११ जागा मिळाल्यामुळे सरपंचपद-उपसरपंचपद या पॅनलला मिळाले; तर अपक्ष उमेदवार सीता अनिल सावंत यांनी पाठिंबा दिल्यामुळे एका मताची सत्ताधारी गटामध्ये भर पडली. यावेळी निवडणूक अधिकारी एस. एन. मडके, तलाठी महेश राऊत, ग्रामसेवक विजय काटकर यांनी काम पाहिले. यावेळी नूतन सदस्य कैलास तोडकरी, सदाशिव पाटोळे, कल्याणी तोडकरी, लक्ष्मी पाटील, शीतल म्हस्के, प्रमिला खडके अमित कोळी, जोत्स्ना गाडे; तर विरोधी गटाचे सदस्य प्रतापसिंह पाटील, सुनीता पाटील, अरुण गिड्डे, अमर ओहोळ, योगिता शिंदे, सोमनाथ माळी उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी अरुण सुर्वे, बिभीषण गायकवाड, पिंटू व्यवहारे व गावातील नागरिक उपस्थित होते.
---
गुलालाची मुक्त उधळण
सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्य हे आमदार बबनराव शिंदे गटाचे समर्थक आहेत. सदर निवडीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सरपंच-उपसरपंच निवडीची घोषणा करताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली.