सोलापूर शहरात कुंभारीसह चिंचोली येथे होणार ‘मेगा क्लस्टर’, वस्त्रोद्योगासाठी जागा मिळाली, जिल्हाधिकाºयांकडे झाली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:30 PM2018-01-18T12:30:53+5:302018-01-18T12:33:07+5:30
केंद्र शासनाने वस्त्रोद्योगासाठी मंजूर केलेल्या मेगा क्लस्टरसाठी चिंचोली (ता. उत्तर सोलापूर) किंवा कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागांचे पर्याय समोर आले आहेत. १५ दिवसांत या दोन्हीपैैकी एक जागा निश्चित करा
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १८ : केंद्र शासनाने वस्त्रोद्योगासाठी मंजूर केलेल्या मेगा क्लस्टरसाठी चिंचोली (ता. उत्तर सोलापूर) किंवा कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागांचे पर्याय समोर आले आहेत. १५ दिवसांत या दोन्हीपैैकी एक जागा निश्चित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वस्त्रोद्योग महामंडळाचे अधिकारी आणि यंत्रमागधारक संघाच्या पदाधिकाºयांना दिले.
सहकारमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून सोलापुरात मेगा क्लस्टर मंजूर करण्यात आले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाने जिल्हाधिकाºयांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहे. गेल्या दीड वर्षांपासून यासाठी बैठका सुरू आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी पुन्हा बैठक झाली. वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाचे संचालक नरेशकुमार, सहायक संचालक एम.वाय.ए. शेख, सोलापुरातील वस्त्रोद्योग कार्यालयाचे विभागीय सहसंचालक के. जी. पवार, यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंट्टप्पा गड्डम, सचिव राजू राठी, मल्लिकार्जुन कमटम, गोविंद बुरा, अमर पाटील आदी उपस्थित होते.
-------------------
कुंभारी येथील जागा निश्चित होणार?
च्मागील महिन्यात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी चार जागांचे पर्याय वस्त्रोद्योग संचालक आणि यंत्रमागधारक पदाधिकाºयांसमोर ठेवले होते. यातील दोन जागांचा विचार अंतिम टप्प्यात सुरू आहे. कुंभारी येथे एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली आहे, परंतु तेथे पाणी उपलब्धतेची अडचण आहे. चिंचोली येथील जागेबाबत यंत्रमागधारक फारसे खुश नाहीत. त्यामुळे कुंभारी येथील जागेवर एकमत होईल, असे बुधवारी झालेल्या बैठकीतून निदर्शनास आले. मेगा क्लस्टरसाठी दीड एमएलडी पाणी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने कुंभारी परिसरात दीड एमएलडी पाणी उपलब्ध करू न देण्याबाबत सहकार्य करू, असे आश्वासन दिले आहे. शिवाय कुंभारी भागात कामगारांची उपलब्ध लवकर होईल, असाही विश्वास यंत्रमागधारक संघाला आहे.